शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

साउंड सिस्टीम व्यावसायिकांचा मूक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 00:24 IST

ध्वनिक्षेपक बसविण्याबाबत शासन व पोलिसांकडून केल्या जात असलेल्या दिशाभूलीच्या निषेधार्थ साउंड सिस्टीम ओनर्स वेल्फेअर असोसिएशन व प्रोफेशनल आॅडिओ अ‍ॅण्ड लायटनिंग असोसिएशनने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढून निवेदन दिले.

नाशिक : ध्वनिक्षेपक बसविण्याबाबत शासन व पोलिसांकडून केल्या जात असलेल्या दिशाभूलीच्या निषेधार्थ साउंड सिस्टीम ओनर्स वेल्फेअर असोसिएशन व प्रोफेशनल आॅडिओ अ‍ॅण्ड लायटनिंग असोसिएशनने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढून निवेदन दिले.शहरातील बी. डी. भालेकर मैदानावरून काढण्यात आलेल्या हा मोर्चा शहरातील प्रमुख मार्गावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना निवेदन सादर करण्यात आले. त्यात म्हटले आहे की, नॉइज पोल्युशन अ‍ॅक्ट व सर्वोच्च न्यायालयाने कुठेही ध्वनिक्षेपक यंत्रणा व्यवसाय करण्यास बंदी केलेली नाही, परंतु न्यायालयाच्या निर्देशांचा विपर्यास करून जनतेची व व्यावसायिकांची महाराष्टÑ पोलिसांकडून दिशाभूल केली जात आहे. साउंडचा व्यवसाय बेकायदेशीर असल्याचे तोंडी निर्देश पोलिसांकडून दिले जात असल्यामुळे राज्यातील हजारो साउंड व्यावसायिक व त्यांच्याकडील कामगारांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळली आहे. कोणतेही सार्वजनिक मंडळे या व्यावसायिकांना काम देत नाहीत, त्यामुळे लाखो रुपयांचे कर्ज घेऊन खरेदी करण्यात आलेली सामग्री पडून आहे. न्यायालयाच्या चौकटीत व्यवसाय करण्यास साउंड सिस्टीमचालक तयार असतानाही डेसिबल रीडिंग चुकीच्या पद्धतीने घेऊन पोलीस व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करीत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या मोर्चात अमर वझरे, मंगेश पठाडे, संदीप भंदुरे, अरविंद म्हसाणे, गोकूळ पाटील, अमित पोटे, राम नवले, वैभव बकरे, राहुल जाधव, सतीश माने, सोहनसिंग चौहाण, अतुल टेमकर, नितीन घाटोळ यांच्यासह शेकडो व्यावसायिक सहभागी झाले होते. या मोर्चात नाशिक जिल्हा आॅर्केस्ट्रा असोसिएशन व साउंड विक्रेत्यांनीही पाठिंबा दर्शविला.