शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

फटाक्याच्या आवाजाने बिबट्या पळाला... उसाचे शेत जळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:15 IST

भगूर: उसाच्या शेतात शिरलेल्या बिबट्याला पळवून लावण्यासाठी शेतकऱ्यांनी फटाके पेटविले मात्र त्यामध्ये शेतीलाच आग लागल्याने तीन शेतकऱ्यांचे सुमारे ...

भगूर: उसाच्या शेतात शिरलेल्या बिबट्याला पळवून लावण्यासाठी शेतकऱ्यांनी फटाके पेटविले मात्र त्यामध्ये शेतीलाच आग लागल्याने तीन शेतकऱ्यांचे सुमारे दहा लाखांचे नुकसान झाले. भगूरपासून जवळच असलेल्या राहुरी गावात ही घटना घडली.

राहुरी गावातील शेतकरी वसंत सांगळे, शरद आव्हाड, संतोष सानप यांच्या उसाची दुपारी तोडणी सुरू होती. शेतामध्ये मजूर काम करीत असताना अनेकांना शेतामध्ये बिबट्या असल्याचे दिसून आले. त्यामुळे सावध झालेल्या मजूर आणि शेतकऱ्यांनी बिबट्याला पळवून लावण्यासाठी लागलीच फटाके पेटविले. फटाक्याच्या आवाजाने बिबट्या पळून लावण्यासाठी चारही बाजूंनी फटाक्यांचा आवाज करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

मोठमोठ्या फटाक्यांच्या आवाजाने बिबट्या पळून गेला मात्र त्यानंतर काही वेळातच शेतपिकांनी पेट घेण्यास सुरुवात केली. ठिकठिकाणी आगीचा धूर निघू लागला आणि आजूबाजूच्या तीन शेतांमध्ये आगीच्या ज्वाळा दिसू लागल्या. या आगीत अंदाजे दहा लाखांचे नुकसान झाल्याची माहिती परिसरातील शेतकऱ्यांनी दिली. यावेळी संपत घुगे, भाऊसाहेब आव्हाड, संदीप घोरपडे, संजय भाऊ कराड, भरत आव्हाड,यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला.

कोट :-

ऊसतोडणी वेळी बिबट्या दिसताच वन विभागाला भ्रमणध्वनीवरून कळविण्यात आले. तलाठी, कृषी अधिकाऱ्यांनाही माहिती देण्यात आली. मात्र वेळेत मदत मिळाली नाही. शेवटी स्थानिकांच्या मदतीनेच आग विझविली.

-राहुरी सरपंच सुनीता घुगे व सदस्य संपत घुगे