शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

अनेकविध फुलांची नाशिककरांना मोहिनी

By admin | Updated: February 4, 2017 23:43 IST

आज होणार पुष्पप्रदर्शनाचा समारोप

नाशिक : अ‍ॅझेलिया, ग्लॅडिअस, कॅनन किलस, आॅरनामेंटन या आणि अशा वीस हजारांहून अधिक फुलांचे प्रदर्शन नाशिकरोड येथील नाशिक्लब हॉटेलमध्ये भरविण्यात आले आहे. केंद्रीय राज्य पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते या पुष्पप्रदर्शनाचे उत्साहात उद्घाटन करण्यात आले.  वर्षभर फुले देणारी झाडे तसेच मोसमी फुलांचा समावेश या प्रदर्शनात करण्यात आला आहे. या पुष्पप्रदर्शनात गुलाबाचे १००, पेटोनियाचे ३२, शेवंतीचे ८ तर एडोनिअम या वाळवंटी पुष्पाच्या १८० प्रजाती या प्रदर्शनात बघायला मिळतात. या प्रदर्शनाअंतर्गत तप्त सूर्यात फुलणारे गॅझेनिया, आफ्रिकन रोझ आणि ब्राझिलीयन बटरफ्लाय ही पुष्पे सगळ्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत. आतापर्यंत या प्रदर्शनाला पाच ते सात हजार नागरिकांनी तर नऊ शाळांतील सुमारे अडीच हजार विद्यार्थ्यांनी भेट दिल्याची माहिती संयोजक संदेश सारंग यांनी दिली. कुठल्याही नर्सरीतील झाडांचा या प्रदर्शनात समावेश न करता हॉटेलच्याच आवारात लागवड करण्यात आलेल्या झाडांचा या प्रदर्शनात समावेश करण्यात आला आहे. मोसमी झाडांची साधारण तीन महिन्यांपूर्वी तर इतर झाडांची गेल्यावर्षी लागवड करण्यात आली आहे. या पुष्पप्रदर्शनांतर्गत गुलाब पुष्प, गुलाब पुष्पा व्यतिरिक्त इतर फुले, शोभिवंत झाडे, पुष्प रांगोळी आणि गार्डन प्रतिकृती या पाच गटात स्पर्धेचेदेखील आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेअंतर्गत डॉ. रुक्मिणी कराड (फुलझाडे), अरुण पाटील (गार्डन प्रतिकृती), डॉ प्राजक्ता भामरे (गार्डन प्रतिकृती) आणि संगीता पोरवाल (टेरारिअम) या विजेत्यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. रविवारी (दि. ५) पुष्पप्रदर्शनाचा अखेरचा दिवस असून, अधिकाधिक नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)