शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

‘सोनू’ला परिचारिकांमुळे जीवदान!

By admin | Updated: April 6, 2017 02:16 IST

नाशिक : मानसिक संतुलन बिघडलेली तसेच रेल्वेस्टेशन, बसस्थानक वा पडीक जागेत वास्तव्य करणाऱ्या एका कुमारी मातेचे महिनाभरापूर्वी जिल्हा रुग्णालयात सिझर करण्यात आले़

नाशिक : मानसिक संतुलन बिघडलेली तसेच रेल्वेस्टेशन, बसस्थानक वा पडीक जागेत वास्तव्य करणाऱ्या एका कुमारी मातेचे महिनाभरापूर्वी जिल्हा रुग्णालयात सिझर करण्यात आले़ डॉक्टरांनी सिझरद्वारे आई व मुलगा या दोघांचेही प्राण वाचविले़; मात्र जन्मत:च बाळाचे वजन कमी व श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यास एसएनसीयू युनिटमध्ये दाखल केल़े यानंतर अवघ्या तीन दिवसांत मुलास सोडून जन्मदात्री निघून गेली़ यानंतर तब्बल महिनाभराहून अधिक काळ आईप्रमाणे काळजी घेतलेल्या मुलास (सोनू) बुधवारी (दि़ ५) आधाराश्रमाकडे सुपूर्द करण्यात आले़ याप्रसंगी एकीकडे सोनू इथून जाणार हे दु:ख तर दुसरीकडे त्यास जीवदान दिल्याचे समाधान असे दुहेरी भाव या युनिटमधील परिचारिकांच्या चेहऱ्यावर होते़शनिवार, दि. ४ मार्च रोजी एका कुमारी गर्भवतीला बाळंतपणासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ विशेष म्हणजे या कुमारीकेचे मानसिक संतुलन बिघडलेले असल्याने तिचे वास्तव्य कधी रेल्वेस्थानक, बसस्थानक तर कधी मोकळ्या जागेवऱ त्यामुळे या मुलाचा जन्मदाता शोधणेही कठीणच़ या कुमारीकेची नॉर्मल डिलिव्हरी शक्य नसल्याचे लक्षात येताच डॉक्टरांनी सिझरचा निर्णय घेतला व तिला मुलगा झाला़ मात्र, जन्मत: या मुलाचे वजन कमी अन् श्वास घेण्यासाठीही त्रास होत असल्याने त्यास जिल्हा रुग्णालयातील स्पेशल न्यूबॉर्न केअर युनिटमध्ये दाखल करण्यात आले़एसएनसीयू युनिटमध्ये दाखल केलेल्या या नवजात मुलाची आई तीन दिवसांतच त्यास सोडून कुठेतरी निघून गेली़ केवळ कमी वजन असलेल्या या मुलास (सोनू) सुरुवातीला आॅक्सिजनवर ठेवण्यात आले होते़ त्यातच मुलाची आईच निघून गेल्याने आईचे दूधही नव्हते़ अशा विचित्र परिस्थितीत मुलाला जगविण्याचे-जीवदान देण्याचे मोठे आव्हान या युनिटपुढे होते़ या युनिटमधील पेडियाट्रिक इनचार्जसह सर्व स्टाफ नर्सेसने या मुलास जीवदान द्यायचेच असा निश्चय करून नियमितपणे तब्बल ३२ दिवस स्पंजिंग, फीडिंग, सस्केनिंग करून काळजी घेतली़ यामुळे ३२ दिवसांत या मुलास जीवदान तर मिळालेच शिवाय त्याचे वजनही चांगले वाढले़ दरम्यान, जन्मदात्री परत न आल्याने या मुलास बुधवारी (दि़ ५) आधाराश्रमाकडे सुपूर्द करण्यात आले़ तब्बल ३२ दिवस आईप्रमाणे सांभाळलेला हा मुलगा परिचारिकांनी लाडाने नाव ठेवलेला सोनू पोलिसांच्या हाती देताना सर्वांनाच गहिवरून आले होते़ एकीकडे या मुलास मृत्यूच्या दाढेतून वाचविल्याचे समाधान होते तर दुसरीकडे तो जाणार याचे दु:ख होते़ एसएनसीयू विभागातील पेडियाट्रिक इनचार्ज वर्षा नामूरकर, श्रद्धा पाटील व स्टाफ नर्सेस आऱ एस़ पाटील, सीमा शेवाळे, मीना नागमोडे, सईदा शाह, प्रमिषा पाटील, मीनाक्षी घोडेस्वार, रोहिणी घुले, भावना कटाळे, भारती शिंदे, श्वेता मांडे, स्मिता कसोटे, माधुरी बनसोडे यांनी सोनूची विशेष काळजी घेऊन त्यास जीवदान दिले आहे़ (प्रतिनिधी)