शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

सोंगांनी जागवली रात्र

By admin | Updated: May 15, 2014 23:54 IST

श्री म्हसोबा महाराज यात्रा महोत्सवास प्रारंभ

श्री म्हसोबा महाराज यात्रा महोत्सवास प्रारंभनाशिक : श्रींचा अभिषेक, महापूजा, पालखी मिरवणुकीने श्री म्हसोबा महाराज यात्रा महोत्सवास आजपासून प्रारंभ झाला़ पहिल्याच दिवशी रात्री दशावतारी सोंगांनी रात्र जागवली़ रविवार पेठ येथील श्री म्हसोबा महाराज यात्रेत आज सायंकाळी महापूजा तसेच अभिषेक संजीवनी व जयवंत मगर तसेच उषा व सुभाष परदेशी या उभयंतांच्या हस्ते करण्यात आले़ सायंकाळी साडेपाच वाजता म्हसोबा मंदिरापासून श्रींच्या पारंपरिक पालखी मिरवणुकीस प्रारंभ झाला़ पारंपरिक ढोल-ताशे ही चर्मवाद्ये व सनईच्या सुरात फु लांनी सजवलेल्या पालखीत श्रींच्या चांदीच्या मुखवट्याची मिरवणूक काढण्यात आली़ यामध्ये दांडप˜ा, सुराढे चक्र याच्या कसरती शिवबाल कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सादर केले़ ही मिरवणूक रविवार कारंजा, रेडक्रॉस सिग्नल, महात्मा गांधी रोड, मेहेर सिग्नल, अशोकस्तंभ, शनी गल्ली मार्गे रविवार पेठेत दाखल होऊन मिरवणुकीचा समारोप झाला़ यामध्ये ठिकठिकाणी नागरिकांच्या वतीने उत्साहात पालखीचे स्वागत करण्यात आले़ रात्री साडेआठ वाजता येथील १५० वर्षांची परंपरा असलेल्या दशावतारी सोंगांना प्रारंभ झाला़ यामध्ये प्रथम गणपती-शारदा हे सोंग आले. यानंतर सुग्रीव-बाली, कच्छ-मच्छ, एकादशी, खंडेराव, भैरवनाथ, राम, लक्ष्मण, सीता, हनुमाण व रावण, भोळा शंकर, राधा- श्रीकृष्ण, हिडींबा, वराह, चंद्र-सूर्य, म्हसोबा महाराज व देवी अशा सोंगांनी पारंपरिक हलगी, सनई व इतर वाद्यांच्या साथीने संपूर्ण रात्र जागवली़ आज सुरू झालेला यात्रा महोत्सव चार दिवस चालणार आहे़ शुक्रवारी सायंकाळी पूजा, तीर्थप्रसाद तसेच मल्लखांबाची प्रात्यक्षिके होणार आहेत़ शनिवारी महाराष्ट्र गीते, तर रविवारी कुस्त्यांची दंगल होणार आहे़ महाप्रसादाने महोत्सवाचा समारोप होणार आहे़ फ ोटो क्रमांक - 15 पीएचएम116रविवार पेठ येथे श्री म्हसोबा महाराज यात्रेनिमित्त महापूजा करताना भाविक .