शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

खुनाच्या आरोपीसह सोनसाखळी चोरास अटक

By admin | Updated: July 1, 2017 01:10 IST

येवला : वर्षभरापूर्वी पत्नीला रॉकेल ओतून जाळून फरार झालेल्या संशयिताला वणी येथून, तर वर्षभरापूर्वीच सोन्याची पोत लांबवणाऱ्या चोरट्याला येवला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : वर्षभरापूर्वी पत्नीला रॉकेल ओतून जाळून फरार झालेल्या संशयिताला वणी येथून, तर वर्षभरापूर्वीच पाच तोळ्यांची सोन्याची पोत लांबवणाऱ्या चोरट्याला येवला शहर पोलिसांनी मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे.शहरातील शनि पटांगण परिसरात राहणाऱ्या मयत सुनीता सुनील जाधव या महिलेला पती सुनील कारभारी जाधव याने ५ आॅगस्ट २०१६ रोजी रॉकेल ओतून जाळले होते. या घटनेत महिलेचा मृत्यू झाल्याने त्याच्यावर खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. घटनेनंतर सुनील जाधव फरार झाला होता. या प्रकरणाचा तपास शहर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वासराव निंबाळकर यांच्याकडे सुरू होता. निंबाळकर यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे हा फरार झालेला संशयित वणी येथे लपून बसलेला असल्याचे समजले. त्यानंतर पोलीस उपअधीक्षक डॉ.राहुल खाड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विश्वासराव निंबाळकर यांनी बुधवारी दिवसभर सापळा रचून संशयित आरोपी सुनील कारभारी जाधव यास ताब्यात घेतले. आरोपीला न्यायालयामध्ये हजर केले असता त्यास २० जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.दि. २५ सप्टेंबर २०१६ रोजी शहरातील बदापूर रोड, वल्लभनगर परिसरातील रहिवासी असलेल्या मंगला प्रफुल्ल लोणारी या सकाळी ८.१५ वाजेच्या दरम्यान फिरायला गेलेल्या असताना त्यांची पाच तोळे सोन्याची पोत मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी खेचून पळवली होती. तपासादरम्यान टोलनाक्यावरील फुटेजमध्ये संशयित दिसून आले. अधिक तपासामध्ये सदरचे चोरटे श्रीरामपूर येथील असून, त्याचे नाव मुस्लीम यासीन इराणी असे असल्याचे समजले. संशयित मुस्लीम इराणी यास सपोनि निंबाळकर व राकेश होलगडे यांनी अटक करून त्याच्याकडून पाच तोळ्याची सोन्याची पोत हस्तगत केली.