शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
3
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
4
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
5
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
6
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
7
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
8
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
9
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
10
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
11
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
12
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
13
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
14
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
15
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
16
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
17
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
18
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
19
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
20
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
Daily Top 2Weekly Top 5

सोनसाखळी चोरट्यांची परिसरातून ‘वरात’

By admin | Updated: May 14, 2017 23:06 IST

भाडेतत्त्वावर दुचाकी घेत सोनसाखळी हिसकावून पोबारा करणाऱ्या पेठरोडवरील अश्वमेधनगरातील सोनसाखळी चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश

नाशिक : भाडेतत्त्वावर दुचाकी घेत सोनसाखळी हिसकावून पोबारा करणाऱ्या पेठरोडवरील अश्वमेधनगरातील सोनसाखळी चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी या ‘श्रीमंत’ चोरट्यांची परिसरातून रविवारी (दि.१४) ‘वरात’ काढली.पादचारी महिलांच्या गळ्यातील सौभाग्याचं लेणं हिसकावून आपले ‘भाग्य’ उजळविण्याचा प्रयत्न करणारा सराईत गुन्हेगार किरण छगन सोनवणे (वय २२, रा. अश्वमेधनगर) याचा पंचवटी पोलिसांनी जेव्हा माग काढला तेव्हा त्याची तीन मजली आलिशान इमारत बघून पोलीसही चक्रावले. जेव्हा साध्या वेशातील पोलिसांनी जेव्हा त्याच्या इमारतीच्या तळमजल्यावरील उंबरा ओलांडला आणि घरात प्रवेश करून त्याला ताब्यात घेतले तेव्हा घरात असलेल्या चैनीच्या महागड्या ब्रॅण्डेड वस्तू बघून पोलीस अवाक् झाले. घरात कोणीही कमावते नसल्याने आलिशान इमारतीच्या या ‘श्रीमंत’ सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी जेरबंद करून गुन्ह्यात खांद्याला खांदा लावून मदत करणारा त्याचा साथीदार विलास राजू मिरजकरच्या (वय २७, रा.लक्ष्मणनगर) मुसक्या आवळल्या. या दोघांचीही पोलिसांनी ‘वरात’ काढून परिसरातील रहिवाशांसमोर पितळ उघडे पाडले. या दोघांना जिल्हा सत्र न्यायालयाने येत्या मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.