शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य यंत्रणेला काहीसा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:14 IST

शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी नाशिक : चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील अनेक आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काढणीस आलेला ...

शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी

नाशिक : चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील अनेक आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काढणीस आलेला केशर, हापूस आंबा वादळामुळे गळून पडल्याने त्याचे नुकसान झाले आहे. विशेषत: आदिवासी भागात त्याचे प्रमाण अधिक असल्याने या शेतकऱ्यांना शासनाने मदत द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

औषध मिळत नसल्याने नाराजी

नाशिक : शहरातील विविध भागातील मेडिकल दुकानांमध्ये अनेक औषधे मिळत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. काही नागरिक औषधांसाठी वारंवार दुकानांच्या चकरा मारत आहेत. पण त्यांच्या पदरी निराशा पडते. राज्य शासनाने याबाबत योग्य ती कार्यवाही करून औषधांचा साठा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे.

लस मिळत नसल्याने नाराजी

नाशिक : लसीकरण केंद्रांवर वारंवार चकरा मारूनही लस मिळत नसल्याने अनेक ज्येष्ठ नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेक नागरिक सकाळीच लसीकरण केंद्रांवर रांगा लावतात. पण लसींचा पुरेसा साठा उपलब्ध होत नसल्याने अनेकांना माघारी फिरावे लागते. याबाबत काहीवेळा कर्मचाऱ्यांसमवेत नागरिकांचे वादही होतात.

किरकोळ विक्रेत्यांसमोर समस्या

नाशिक : लॉकडाऊनमुळे बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक बंद झाल्याने शहरातील किरकोळ भाजी विक्रेत्यांना माल मिळणे मुश्किल झाले आहे. या व्यापाऱ्यांनीही शेतकऱ्यांच्या बांधावर आपला मोर्चा वळविला आहे. पण एकाच शेतकऱ्याकडे सर्व भाजीपाला मिळत नसल्याने त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच या व्यापाऱ्यांची मागणी कमी असल्यामुळे त्यांना माल देणे शेतकऱ्यांनाही परवडत नसल्याने भाजी बाजारातील विक्रेत्यांची संख्या कमी झाली आहे.

शहरात अवैध मद्यविक्री जोरात

नाशिक : लॉकडाऊनमुळे मद्यविक्रीची दुकाने बंद असल्याने अवैध मद्यविक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अनेक भागात सर्रासपणे अवैध मद्य विक्री केली जाते. पोलिसांचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. अवैध मद्यविक्रीला पोलिसांनी आळा घालावा अशी मागणी करण्यात येत आहे. अनेक ठिकाणे पोलिसांना माहिती असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

हॉटेल व्यावसायिकांसमोर विविध अडचणी

नाशिक : मागील वर्षापासून अडचणीत सापडलेल्या हॉटेल उद्योगाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही व्यावसायिकांनी तर हॉटेल बंद करणे पसंत केले आहे. हॉटेलचा मेंटेनन्स आणि स्टाफ सांभाळणे अनेकांना कठीण झाले आहे. लॉकडाऊन उघडल्यानंतरही ग्राहक येतात की नाही याबाबतही शासंकता व्यक्त केली जात असल्याने सध्यातरी पर्यायी व्यवसाय करण्याचा विचार अनेकजण करीत आहेत.