शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस भरतीचा पेच सोडवावा; सुधारित जीआरची प्रतीक्षाच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:35 IST

नाशिक : राज्य शासनाने पोलीस भरतीबाबत काढलेला अध्यादेश न्यायालयीन आदेशानंतर स्थगित करण्यात आला आहे. या अध्यादेशमध्ये सुधारणा करत शुद्धिपत्रक ...

नाशिक : राज्य शासनाने पोलीस भरतीबाबत काढलेला अध्यादेश न्यायालयीन आदेशानंतर स्थगित करण्यात आला आहे. या अध्यादेशमध्ये सुधारणा करत शुद्धिपत्रक जारी करण्यात येणार आहे. त्यानंतरच पोलीस भरती प्रक्रियेचा मार्ग खुला होणार आहे. एकूण भरतीप्रक्रिया लांबणीवर पडल्यामुळे भरतीचा सराव करणाऱ्या इच्छुक तरुणांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. नाशिक पोलीस आयुक्तालयात ३ हजार १६ कर्मचारी तर ग्रामीण पोलीस दलात ३ हजार २०० कर्मचारी सध्या कर्तव्यावर हजर आहेत. नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाकरिता ३ हजार ४४६ कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत. त्यापैकी एकूण ३ हजार २०० कर्मचारी हजर आहेत. २१३ पदे रिक्त आहेत, तसेच शहर पोलीस आयुक्तालयात केवळ २० ते २२ कर्मचारी कमी आहेत. राज्यस्तरीय पोलीस भरती प्रक्रिया मागील काही वर्षांपासून रखडली आहे. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी राज्य शासनाने पाेलीस भरतीबाबत जीआर काढला. मात्र, या जीआरमध्ये सुधारणा करण्याचे आदेश देत न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली.

राज्यातील पोलीस भरतीची प्रक्रिया पार पाडण्यासठी ‘एसईबीसी’चे आरक्षण न ठेवण्याचा निर्णय राज्याच्या गृहविभागाने घेतला आहे. ‘एसईबीसी’तून आलेले अर्जदारांची पात्रता ठरविताना खुल्या प्रवर्गाची वयोमर्यादा लागू केली जाणार आहे. राज्य सरकारने याबाबत शासन निर्णय जारी केला आहे. जे उमेदवार खुल्या प्रवर्गातील अटी व शर्तींची पूर्तता करतात, त्यांचा खुल्या प्रवर्गातून विचार करावा, असा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे.

-

--इन्फो--

पोलीस आयुक्तालयाचे मनुष्यबळ असे...

उपआयुक्त-४, सहायक आयुक्त-६ (रिक्त-२) पोलीस निरीक्षक-५३ (रिक्त-३), सहायक निरीक्षक-७२ (रिक्त-३), उपनिरीक्षक-७४ (रिक्त-४५) नाशिक जिल्ह्याची लोकसंख्या ६२ लाख इतकी असून, एकूण ६ हजार २०० पोलीस कर्मचारी जिल्ह्यासाठी आहे. यामध्ये शहर व ग्रामीण पोलीस दलात प्रत्येकी ३ हजार कर्मचारी कर्तव्यावर आहेत. सरासरी जिल्ह्यातील १ हजार लोकांमागे एक पोलीस कर्मचारी आहे.

--कोट--

पोलीस भरती प्रकियेचा गुंता तातडीने सोडवावा आणि नव्याने शासनाने लवकरात लवकर भरतीचा जीआर काढावा, जेणेकरून इच्छुक तरुणांची सराव करताना होणारी घालमेल थांबण्यास मदत होईल.

- वैभव पिंगळे, तरुण

----

पोलीस भरतीबाबतचा जीआर जाहीर होताच अनेकांच्या आशा पल्लवितही झाल्या. बहुसंख्य तरुणांनी त्या दृष्टीने स्वत:ला मैदानातही झोकून दिले. मात्र, अचानकपणे या जीआरमध्ये त्रुटी समोर आल्याने तो रद्द करण्यात आला. त्यामुळे तरुणांमध्ये नाराजी पसरली. पोलीस भरती प्रक्रिया लांबणीवर पडल्याने संताप व्यक्त होत आहे.

- विठ्ठल शिंदे, तरुण

---

जीआरमध्ये आरक्षणानुसार सुधारणा झाल्यानंतरच पोलीस भरतीचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे नव्या जीआरकडे आता लक्ष लागले आहे. भरतीसाठी तयारी केली असून, सरावही नियमितपणे सुरू ठेवला आहे.

-समीर अन्सारी, तरुण

-----

डमी फॉरमेट आर वर १२पोलीस नावाने सेव्ह आहे.