शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाज संघटन

By admin | Updated: October 18, 2016 02:50 IST

मेळाव्यांची तयारी : मराठा मूकमोर्चांनी दिली प्रेरणा

नाशिक : राज्यभरात ठिकठिकाणी सुरू असलेल्या मराठा समाजाच्या मूकमोर्चांची प्रेरणा घेत आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अन्य समाजही संघटित होऊ पाहत असून, समाज मेळाव्यांची तयारी केली जात आहे. येत्या २५ आॅक्टोबरला बलुतेदार-अलुतेदार समाज संघटनेने मेळाव्याचे आयोजन करत निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत दिले आहेत.गेल्या ९ आॅगस्टपासून राज्यभरातील विविध शहरांमध्ये आपल्या विविध मागण्यांसाठी मराठा समाजाच्या वतीने विराट मूकमोर्चे काढले जात आहेत. अतिशय शिस्तबद्ध व नियोजनबद्ध निघणाऱ्या या मूकमोर्चांनी आंदोलनाचा एक नवा अध्याय सुरू केला असतानाच त्यातून समाजाचे संघटनही घडून येत आहे. मूकमोर्चाच्या माध्यमातून मराठा समाज एकवटला आहे. त्याचीच प्रेरणा घेत आता वेगवेगळे समाजघटकही एका झेंड्याखाली एकत्र येऊ पाहत आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या समाजालाही स्थान मिळावे, समाजातील उपेक्षितांना न्याय मिळावा, सत्तेच्या मुख्य प्रवाहात येत प्रलंबित प्रश्न मार्गी लागावेत, यासाठी छोट्या-मोठ्या समाजघटकांकडून एकत्र येण्याची तयारी केली जात आहे. त्यासाठी प्राथमिक बैठकाही सुरू झाल्या असून, त्यात समाज बांधवांची खानेसुमारी करण्यावर भर दिला जात आहे. बलुतेदार-अलुतेदारांच्या संघटनेनेही आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर समाज संघटनावर लक्ष केंद्रित केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून येत्या २५ आॅक्टोबरला दुपारी ४ वाजता कॅनडा कॉर्नरवरील वसंत मार्केटमधील श्री समर्थ मंगल कार्यालयात पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केला आहे. (प्रतिनिधी)