शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

१६ ठिकाणी स्मार्ट पार्किंग आठवडाभरात सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:30 IST

नाशिक- शहरातील वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने शहरात राबवण्यात येणाऱ्या स्मार्ट पार्किंगचा रखडलेला प्रकल्प येत्या आठवडाभरात सुरू ...

नाशिक- शहरातील वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने शहरात राबवण्यात येणाऱ्या स्मार्ट पार्किंगचा रखडलेला प्रकल्प येत्या आठवडाभरात सुरू होणार असून २८ ऑन स्ट्रीट पार्किंग पैकी १६ ठिकाणी ही सेवा सुरू हेाणार असल्याचे कंपनीच्या सूत्रांनी दिली. अर्थात, महापालिकेतील नगरसेवकांनी घेतलेल्या आक्षेपाचे निराकरण काय झाले हे मात्र अनुत्तरीत आहे.

नाशिक शहरात वाहतुकीची समस्या वाढत आहे. विशेषत: रस्त्यात अस्ताव्यस्त उभ्या राहणाऱ्या वाहनांना शिस्त लागावी आणि रहदारीला अडथळा ठरू नये यासाठी महापालिकेच्या स्मार्ट सिटी कंपनीने बीओटी तत्त्वावर स्मार्ट पार्किंग राबवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी २८ ऑन स्ट्रीट म्हणजेच रस्त्याच्या कडेला तर पाच ठिकाणी मेाकळ्या मैदानात पार्किंग करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी खासगी भागीदारासाठी निमंत्रित करण्यात आले होते. त्यानुसार २२ ठिकाणे संबंधित ठेकेदाराने तयार केली असून त्यातील १६ रस्त्यांवर वसुलीसाठी कंपनीला परवानगी मिळाली असल्याने आता लवकरच वसुली करण्यात येणार आहे. त्यामुळे आता टोईंग पाठोपाठ स्मार्ट पार्किंग सुरू होणार असल्याने वाहतुकीला शिस्त लागण्याची शक्यता असल्याचे कंपनीच्या सूत्रांनी सांगितले.

नाशिकमध्ये यापूर्वीच स्मार्ट सिटी कंपनीने ठेकेदार कंपनीला वसुलीसाठी एक वर्ष ३ महिने मुदतवाढ देण्यात आली आहे. कंपनी दहा वर्षे स्मार्ट पार्किंगचा ठेका चालवणार आहे. कोरोनामुळे एक वर्ष वाया गेल्याने ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

इन्फो...

दुचाकीला पाच तर मोटारीला दहा रुपये

नाशिक शहरात सुरू होणाऱ्या स्मार्ट पार्किंगचे दर देखील निश्चित झाले असून दुचाकीला पाच रुपये तर चारचाकी मोटारीला दहा रुपये असे दर निश्चित करण्यात आले आहेत. यापूर्वी चाचणी स्तरावर कंपनीने सर्वेक्षण केले तेव्हा १९ दिवसात दीड लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत.