शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

‘स्मार्ट सिटी’चा चेंडू शासनाच्या कोर्टात

By admin | Updated: December 12, 2015 23:33 IST

हस्तक्षेपाची शक्यता : सत्ताधारी मनसे मात्र भूमिकेवर ठाम

नाशिक : केंद्र सरकारच्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेत सहभागी व्हायचेच नाही, अशी भूमिका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी घेतल्यानंतर महापालिकेतील सत्ताधारी मनसेने ‘एसपीव्ही’ (स्पेशल पर्पज व्हेईकल) वगळून ठराव प्रशासनाला सुपूर्द करत आपल्या भूमिकेत कोणताही बदल होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे, तर दि. १५ डिसेंबरपर्यंत प्रशासन राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर करणार असल्याने दोन दिवसांत शासन स्तरावर वेगवान घडामोडी घडण्याची शक्यता भाजपातून व्यक्त केली जात आहे. महासभेने ‘स्मार्ट सिटी’चा चेंडू आता राज्य शासनाच्या कोर्टात ढकलला असून, शासनाने सदर ठराव विखंडित केल्यास महासभेच्या सार्वभौमत्वाचा मुद्दा घेऊन सत्ताधारी मनसे आक्रमक होण्याची शक्यता बोलून दाखविली जात आहे. महासभेने ‘एसपीव्ही’ वगळून स्मार्ट सिटीचा ठराव प्रशासनाला सादर केल्याने भाजपाने सत्ताधारी मनसेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यास सुरुवात केली आहे. सत्ताधारी मनसेने एसपीव्हीचा समावेश करत ठरावात बदल करावा यासाठी पुन्हा विशेष महासभा घ्यावी, याकरिता भाजपाकडून हालचाली सुरू झाल्या होत्या. स्थायीच्या चार सदस्यांची जमवाजमवही केली जात होती; परंतु सेनेने भाजपाला दाद न दिल्याने भाजपाचा विशेष सभा बोलाविण्याचा प्रयत्न फसला.