शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

‘स्मार्ट’ प्रचाराचा खर्च डोईजड

By admin | Updated: February 14, 2017 01:17 IST

लाखोंचे पॅकेज : सोशल मीडिया सेवा पुरविणाऱ्या एजन्सीला प्राधान्य

नाशिक : या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये बहुसदस्यीय प्रभागपद्धती असून, प्रभागाची व्याप्ती मोठी अन् प्रचाराचा कालावधी कमी असल्यामुळे मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी ‘स्मार्ट’ प्रचाराचा फंडा उमेदवारांनी शोधला असला तरी त्यांना यासाठी लाखो रुपयांचे पॅकेज घ्यावे लागत असल्याने हा खर्च डोईजड होत आहे. मतदारांची लोकसंख्या लक्षात घेता प्रत्येकाजवळ पोहचणे कदापि शक्य नाही. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात उमेदवारांनी संगणकीकृत प्रचारयंत्रणा राबविण्यात सुरुवात केली आहे. संबंधितांकडून इंटरनेटचा वापर पुरेपूरपणे करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी शहरातील सुमारे वीस ते पंचवीस कंपन्या बाजारात उतरल्या आहेत. या कंपन्यांकडून मतदारांच्या संख्येनुसार दर निश्चित करून पॅकेजेस ठरविले जात आहे. लघुसंदेशाची भाषा, संख्या यावर दर अवलंबून आहेत. इंग्रजीत लघुसंदेश पाठवायचे झाल्यास प्रति संदेश तीस पैसे, तर मराठीत संदेशाचे १५ पैसे प्रति लघुसंदेश याप्रमाणे दर आकारले जात आहे. यासाठी संबंधित कं पन्यांना विविध लोकांच्या भ्रमणध्वनी क्रमांकाच्या माहितीचा साठाही उमेदवारांना उपलब्ध करून द्यावा लागतो. त्यानंतर संबंधित कं पन्यांकडून त्या भ्रमणध्वनीक्रमांकांवर उमेदवाराचा प्रभाग क्रमांक, पक्ष, निवडणूक चिन्ह मतदानाचा वार, दिनांक आदि माहिती असलेला लघुसंदेशांचा भडीमार सुरू केला जातो. मोबाइल क्रमांकांच्या माहितीचा साठा मिळविण्यासाठी काही उमेदवारांनी चक्क मोबाइल कंपन्यांना गाठले आहे. यासाठी उमेदवारांना त्या कंपन्यांनादेखील पैसे मोजावे लागत आहे. कंपन्या किंवा एजन्सीक डून किमान एक लाखाचे पॅकेज घेतल्याशिवाय सेवा पुरविली जात नाही. लाइव्ह व्हिडीओ संकल्पना सध्या निवडणुकीच्या हंगामात ‘फेसबुक लाइव्ह’ संकल्पना जास्त लोकप्रिय ठरत आहे. संबंधित उमेदवारांकडून फेसबुकच्या ‘लाइव्ह’ पर्याय निवडून त्या आधारे स्वत:ची चित्रफित संबंधित मतदरसंघामधील तरुणाईपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्नही केला जात आहे. यासाठी स्वतंत्ररीत्या टेक्नोसॅव्ही युवकांची नियुक्ती उमेदवारांकडून करण्यात आली असून, दिवसभर या युवकांना त्या कामाचा पगारही मोजावा लागतो.