चौकट -
मानवी आरोग्याची होतेय हानी
रासायनिक खतांच्या वापरामुळे शेतीच्या आणि मनुष्याच्या आरोग्यावरही दुष्परिणाम झाले आहेत. वारेमाप रासायनिक खते आणि कीटकनाशकांमुळे मानवाच्या आरोग्यावर हानिकारक परिणाम झाले आहेत. यामुळे विविध आजार जडले आहेत. रासायनिक खतांच्या वाढत्या किमतीमुळे शेतीचा भांडवली खर्च वाढला आहे.पर्यायाने शेतकऱ्यांचा फायदा कमी झाला आहे. या खतांमुळे सर्व नद्या, नाले याबरोबरच भूगर्भातील पाणी दूषित झाले आहे. हेच पाणी सिंचनासाठी वापरले जात असल्याने त्याचे अनेक दुष्परिणाम दिसत आहेत.
चौकट -
शेणखताचा वापर केल्याने जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते. शेणखत टाकल्याबरोबर ते लगेच लागू होत नाही त्याला किमान एक वर्षाचा कालावधी लागतो. यामुळे जमिनीतील जिवाणूंची संख्या वाढण्याबरोबरच सचिद्रताही वाढते. यामुळे पाण्याच्या पातळीतही वाढ होते. शेणखत एकदा टाकल्यानंतर किमान तीन वर्षे खत टाकण्याची गरज भासत नाही. शेणखतामुळे पिकांचीही पौष्टिकता वाढून ती अधिक चवदार होतात.
चौकट -
शेणखत आणि रासायनिक खतांच्या किमतीत मोठी तफावत आहे. जिल्ह्यात एक ट्रॅक्टर ट्रॉली शेणखतासाठी ४५०० ते ६००० हजार रुपये मोजावे लागतात. याशिवाय शेणखत पसरविण्याची मजुरी आणि ट्रॉली भरण्याचा खर्च वेगळा करावा लागतो. यामुळे एक एकरवर शेणखत पसरविण्यासाठी किमाण २५ ते ३० हजारांचा खर्च येतो. रासायनिक खतांच्या डीएपी, युरिया यांच्या बॅगच्या वेगवेगळ्या किमती आहेत. खताची एक गोणी किमान १२०० ते १३०० रुपयांपर्यंत जाते, तर युरियाची एक गोणी ३०० रुपयांपर्यंत मिळते.