नाशिकरोड : शहरामध्ये पाकीटमारी व बॅगेतून रोकड, सोन्याचे दागिने चोरणाऱ्या सहा संशयिताना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे.पोलीस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पंचवटी पोलिसांनी दिंडोरी नाका, गंगाघाट आदि ठिकाणहून मंगळवारी सकाळी सहा जणांना पाकिटमारी, बॅगलिफ्टींग, बॅगेतून रोकड-सोन्याचे दागिने चोरीच्या संशयावरून ताब्यात घेतले आहे. पंचवटी निमाणी बसस्थानक ते नाशिकरोड दरम्यान एसटी बस व रिक्षामधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची होणारी लुबाडणूक प्रकरणी ताब्यात घेतलेल्या सहा जणांना उपनगर पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. उपनगर पोलिसांनी त्यांची सायंकाळी उशिरापर्यंत कसून चौकशी केली असता त्यातील दोघेजण हे मासे विक्रीचा व्यवसाय करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे, तर उर्वरित चौघेजण यांच्यावर शहरात कुठे गुन्हे आहे का याचा पोलीस शोध घेत असून, त्यांना संशयावरून ताब्यात घेण्यात आल्याचे उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
पाकीट मारणारे सहा संशयित ताब्यात
By admin | Updated: February 17, 2016 00:34 IST