सिन्नर : प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर, राज्य विज्ञान गणित शिक्षण संस्था आयोजित तालुका स्तरीय विज्ञान मेळावा येथील भिकुसा हायस्कूल येथे पंचायत समिती शिक्षण विभाग व सिन्नर तालुका गणित विज्ञान अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.विस्तार अधिकारी राजीव लहामगे यांच्या हस्ते मेळावाचे उद्घाटन करण्यात आले. आजच्या युगात विज्ञान व तंत्रज्ञान मानवाच्या कल्याणासाठी उपयुक्त कसे ठरते व विद्यार्थ्यांनी जिज्ञासा अंगी बाणून विज्ञानाचे विविध प्रयोग स्व:त पडताळून निर्ष्कष शोधा असे सांगितले. गणित विज्ञान अध्यापक संघ अध्यक्ष कल्पेश चव्हाण अध्यक्ष यांनी विज्ञान मेळाव्याची कार्यवाही या संबधी माहिती दिली.भिकुसा हायस्कूलचे मुख्याध्यापक शिरसाट सर यांनी विद्यार्थ्यांना आपल्या वकृत्वातून आपण विज्ञानाचे महत्व सहज सोप्या शब्दात मांडण्याचे कौशल्यसांगितले. गणित विज्ञान अध्यापक संघ कार्यवाह आर. टी. गिरी यांनी मानले. या मेळाव्यासाठी परीक्षक के. डी. कुलकर्णी, प्रा. एस.एस.काळे, गणित विज्ञान अध्यापक संघाचे सर्व पदाधिकारी व तालुक्यातील विज्ञान शिक्षक उपस्थित होते.
सिन्नरला तालुकास्तरीय विज्ञान मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 18:36 IST