बारा वर्षांपासून मंडळ शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करते. मंडळाची शिवजन्म उत्सवाची बैठक नुकतीच झाली. दरवर्षीप्रमाणे यंदाही कोणाकडून वर्गणी गोळा न करता मंडळाच्या प्रमुख सभासदांमध्ये पैसे काढून उत्सव साजरा करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तसेच या वर्षापासून मंडळ शिवजन्म उत्सव पाळणा सोहळा साजरा करणार असून, महिलांच्या हस्ते हा सोहळा साजरा होणार आहे. त्यासाठी स्टेजवर ६० बाय ५० फूट उंच किल्ल्याचा सेट उभारण्यात येणार आहे. २० फूट उंच महाराजांचा पुतळा ठेवण्यात येणार आहे. कोरोना काळात कोरोना योध्दा म्हणून काम केलेल्या व्यक्तींचा आमदार माणिकराव कोकाटे व जिल्हा परिषद सदस्य सिमंतीनी कोकाटे यांच्याहस्ते सत्कार करण्यात येणार असल्याचे कासार यांनी सांगितले.
यावेळी विजय आव्हाड, गणेश माळी, जयराम शिंदे, हेमंत आंधळे, सचिन पाटील, विकास माळी, राहुल गरगटे, पिंटू चव्हाण, विजय भडांगे, ईश्वर काकड, सचिन शिंदे, पोपट लोंढे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.