शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं टम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
5
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
6
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
7
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
8
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
9
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
10
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
12
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
13
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
14
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
15
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
16
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
17
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
18
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
19
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
20
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल

सिन्नर वाचनालय पंचवार्षिक निवडणुकीत प्रगती पॅनलची सरशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 01:16 IST

संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेल्या सिन्नर सार्वजनिक वाचनालयाच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी प्रगती पॅनलचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले, तर परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. यापूर्वी प्रगतीचे हेमंत वाजे यांची कार्यवाहपदी बिनविरोध निवड झाली होती.

सिन्नर : संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेल्या सिन्नर सार्वजनिक वाचनालयाच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी प्रगती पॅनलचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले, तर परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. यापूर्वी प्रगतीचे हेमंत वाजे यांची कार्यवाहपदी बिनविरोध निवड झाली होती.सिन्नर सार्वजनिक वाचनालयाच्या पंचवार्षिक निवडणुकीत अध्यक्ष, दोन उपाध्यक्ष व विश्वस्तपदाच्या ९ जागांसाठी सत्ताधारी प्रगती पॅनल व परिवर्तन पॅनलमध्ये सरळ लढत झाली. गेल्या अनेक वर्षांपासून बिनविरोध निवडीची परंपरा गेल्या निवडणुकीपासून खंडित झाली होती. शुक्रवारी ५२१ पैकी ४६५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दुपारी ४ वाजता मतमोजणीला सुरूवात झाली. महिलांसाठी राखीव असलेल्या कार्यकारिणी सदस्य तथा विश्वस्तपदाच्या दोन जागांवर प्रगती पॅनलच्या विद्यमान सदस्य निर्मल ताराचंद खिंवसरा (३८३) व प्रज्ञा प्रशांत देशपांडे (४१४) ह्या विजयी झाल्या, तर परिवर्तनच्या डॉ. कल्पना परदेशी (७६) पराभूत झाल्या. त्यानंतर विश्वस्तपदाच्या सातही जागांवर प्रगतीचे उमेदवारमताधिक्यानेविजयी झाले. चंद्रशेखर कोरडे (३५९), सागर गुजर (३५८), मनीष गुजराथी (३३६), जितेंद्र जगताप (२९१), राजेंद्र देशपांडे (३५६) विलास पाटील (३३१), संजय बर्वे (३३०) हे विजयी झाले. तर परिवर्तनचे नामदेव कोतवाल (१४२), डॉ. श्यामसुंदर झळके (९६), विजय कर्नाटकी (१२१), अशोक घुमरे (९५), अजय शिंदे (१०६), अ‍ॅड. गोपाळ बर्के (८२) यांना पराभव स्वीकारावा लागला. उपाध्यक्षपदाच्या निवडीत प्रगतीचे नरेंद्र वैद्य (२९३) व पुंजाभाऊ सांगळे (३४०) यांनी परिवर्तनचे राजेंद्र अंकार (११०) व अ‍ॅड. विलास पगार (१०७) यांचा सरळ लढतीत पराभव केला. अध्यक्षपदासाठी झालेल्या दुरंगी लढतीत प्रगतीचे उमेदवार व वाचनालयाचे अध्यक्ष कृष्णाजी भगत (३८५) यांनी परिवर्तनचे डॉ. जी. एल. पवार (७५) यांचा तब्बल तीनशे मतांनी पराभव केला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अ‍ॅड. शिवाजी देशमुख यांनी काम पाहिले.

टॅग्स :Electionनिवडणूक