शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
3
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
4
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
5
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
6
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
7
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
8
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
9
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
10
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
11
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
12
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
14
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
15
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
16
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
17
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
18
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
19
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
20
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू

सिन्नरला सहा लाख रुपये लांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 16:54 IST

सिन्नर : शहरातील देना बॅँकेतून पैसे काढून पायी चाललेल्या शेतकऱ्यांच्या हातातील सहा लाखांची रोकड असलेली पिशवी पल्सर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी पळवल्याची घटना शुक्रवार (दि.८) रोजी दुपारच्या सुमारास घडली. पोलिसांनी तातडीने परिसराची नाकाबंदी करूनही पल्सरचा शोध घेण्याचा प्रस्ताव केला. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही.

ठळक मुद्देतालुक्यातील खंबाळे येथील कारभारी आंधळे यांनी घरून दोन लाख रुपये बरोबर आणले होते, तर देना बॅँकेच्या सिन्नर शाखेतून दीडच्या सुमारास त्यांनी चार लाख रुपये काढले.

सिन्नर : शहरातील देना बॅँकेतून पैसे काढून पायी चाललेल्या शेतकऱ्यांच्या हातातील सहा लाखांची रोकड असलेली पिशवी पल्सर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी पळवल्याची घटना शुक्रवार (दि.८) रोजी दुपारच्या सुमारास घडली. पोलिसांनी तातडीने परिसराची नाकाबंदी करूनही पल्सरचा शोध घेण्याचा प्रस्ताव केला. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही.तालुक्यातील खंबाळे येथील कारभारी आंधळे यांनी घरून दोन लाख रुपये बरोबर आणले होते, तर देना बॅँकेच्या सिन्नर शाखेतून दीडच्या सुमारास त्यांनी चार लाख रुपये काढले. ही रक्कम त्यांना आपल्या नाशिकच्या मित्राला जमिनीच्या खरेदीसाठी उसनवार म्हणून द्यायची होती. ही रक्कम नाशिकला घेऊन जाण्यासाठी त्यांचे काही मित्र बॅँकेपासून काही अंतरावर कोंबडा बिडी कारखान्याच्या समोर पुणे महामार्गावर चारचाकीसह थांबलेले होते. आंधळे यांनी बॅँकेतून रक्कम काढून पिशवीत ठेवली व इतर चार मित्रांसह गप्पा मारत ते पुणे महामार्गावरील चारचाकी वाहनाकडे जात होते. महामार्गावर आल्यावर अचानक मारुती मंदिराकडून पल्सर दुचाकीवर आलेल्या दोघांपैकी मागे बसलेल्या युवकाने आंधळे यांच्या हातातील पैशांची पिशवी हिस्कावून तेथून पळ काढला. क्षणात घडलेल्या या घटनेनंतर पल्सर दुचाकी सुसाट वेगाने जुन्या संगमनेर नाक्याकडे निघून गेली. या पल्सरचा नंबर कोणालाही दिसू शकला नाही. या दुचाकीचा पाठलाग करण्याचा प्रयत्न संगमनेर नाक्याकडून पल्सर नेमकी कुठल्या बाजूला गेली हे न समजल्याने आंधळे व त्यांच्या मित्रांना सोडून द्यावा लागला. आंधळे यांनी तातडीने सिन्नर पोलीस ठाण्यात सदर घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने परिसरात नाकाबंदी करून पल्सरचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात त्यांना यश येऊ शकले नाही. पोलिसांनी बॅँकेतील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, आंधळे यांच्यावर पाळत ठेवून कुणी हा प्रकार केला का याचाही तपास करण्यात येत आहे.