शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नरमधील धरणे ‘ओव्हरफ्लो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 01:43 IST

सिन्नर : यावर्षी उशिरा आगमन झालेल्या वरुणराजाने सिन्नर तालुक्याच्या पश्चिम डोंगराळ भागात गेल्या आठवड्याभरापासून मुक्काम ठोकल्याने तालुक्यातील महत्त्वाची धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : यावर्षी उशिरा आगमन झालेल्या वरुणराजाने सिन्नर तालुक्याच्या पश्चिम डोंगराळ  भागात गेल्या आठवड्याभरापासून मुक्काम ठोकल्याने तालुक्यातील महत्त्वाची धरणे ओव्हरफ्लो  झाली आहेत. तालुक्यातील सर्वात मोठे भोजापूर धरण ९५ टक्के भरले आहे. शहरालगत असणारे सरदवाडी धरण, पश्चिम पट्ट्यातील कोनांबे, ठाणगावजवळील उंबरदरी धरण ओसंडून वाहत असल्याने तालुक्यात समाधानकारक वातावरण आहे. गेल्या आठवड्यापासून सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे सर्वप्रथम बोरखिंड धरण ओव्हरफ्लो झाले. त्यापाठोपाठ कोनांबे, उंबरदरी धरण भरले आहे. त्यामुळे म्हाळुंगी व देव नदीला पूर आल्याचे चित्र आहे. रविवारी रात्री सिन्नरजवळील सरदवाडी धरण  भरले. म्हाळुंगीला पूर आल्याने तालुक्यातील सर्वात मोठे भोजापूर धरण भरण्याच्या मार्गावर आहे. भोजापूर धरण सुमारे ९५ टक्के भरले असून, सोमवारी रात्री ते ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात जोरदार पाऊस होत असताना पूर्वभागात मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळत आहेत. पूर्वभागातील नद्यांना व ओढ्यांना अद्याप पाणी नसले तरी पश्चिम भागातून येणाऱ्या पूरपाण्यामुळे देव नदी प्रवाहित झाली आहे. सरदवाडी ‘ओव्हरफ्लो’सरदवाडी : पश्चिम पट्ट्यात सुरू असलेल्या पावसामुळे शिव नदी प्रवाहित झाल्याने शहराजवळील सरदवाडी धरण रविवारी रात्री भरले. गेल्या दोन-तीन दिवसांपासून संततधार असल्याने सरदवाडी धरणही भरले आहे. उन्हाळ्यात कोरडेठाक झालेल्या सरदवाडी धरणात गेल्या आठ दिवसांपासून पाण्याची आवक सुरू झाली होती. त्यातच गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाच्या रिपरिपीनंतर शनिवारपासून पावसाने जोर पकडला होता. जामगाव, पास्ते, खापराळेसह शिव नदीच्या उगम क्षेत्रात कोसळलेल्या धो धो पावसामुळे शिव नदी प्रवाहित होऊन धरण भरले. शिव नदीसह सरदवाडी धरणात येणाऱ्या चिखली, राणीखाण, बैलाचे रान या प्रमुख नाल्यांसह सर्व लहान-मोठे ओढेही वाहत असल्याचे चित्र होते. देव नदीवर कुंदेवाडी, मुसळगाव, खोपडी, देवपूर, कीर्तांगळी येथील बंधारे भरत देवनदी सोमवारी पहाटे वडांगळी येथे पोहचली. त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला आहे.गेल्या अनेक वर्षात दुशिंगपूर व फुलेनगर या बंधाऱ्यात पाणी आलेले नाही. यावर्षी लवकरच भोजापूर धरण ओव्हरफ्लो होत असून, पावसाळ्यात कालव्यांद्वारे या बंधाऱ्यांमध्ये पाणी सोडल्यास पूर्वभागातील पाणीटंचाई कमी होईल. पूर कालव्यांद्वारे भोजापूरचे पाणी या दोन बंधाऱ्यात सोडण्याची मागणी वावीचे माजी सरपंच रामनाथ कर्पे, फुलेनगरचे माजी सरपंच संपत पठाडे, खंडेराव अत्रे, सोमनाथ थोरात, दुशिंगपूरचे कचरू घोटेकर, सुकदेव ढमाले, रामनाथ ढमाले, चंद्रभान गोराणे यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.