यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेतील प्रथम विजेतेपदाचे सिन्नर कॅपिटल संघास ५१ हजार, द्वितीय एस. एल. टायगर्स संघास ३१ हजार, तृतीय स्ट्रायकर्स संघास २१ हजार, चतुर्थ पारितोषिक एसडब्लू सुपर किंग संघास ११ हजार रुपये देऊन खेळाडूंना गौरविण्यात आले. तसेच इतर वैयक्तिक बक्षीस देऊनदेखील खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. बक्षीस वितरण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून महिला खेळाडू निर्मला कोटनीस, स्नेहा कोकणे, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, माजी आमदार योगेश घोलप, प्रभाग सभापती जयश्री खर्जुल, नगरसेविका सुनीता कोठुळे, ज्योती खोले, नगरेसवक सूर्यकांत लवटे, रमेश धोंगडे, केशव पोरजे, प्रशांत दिवे, राजू लवटे, नितीन चिडे, योगेश देशमुख, प्रकाश कोरडे, अतुल धोंगडे, लवटे, विश्वास कापरे, नीलेश पाटील, सोमनाथ घाटे, योगेश गाडेकर, सचिन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत महानुभव, संदीप बोराडे यांनी केले. आभार कुमार पगारे, सुकदेव लोंढे मानले.