शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

शिरसमणी-साकोरे रस्त्याची दुरवस्था

By admin | Updated: July 3, 2017 00:09 IST

कळवण : शिरसमणी-साकोरे रस्त्याची दुरावस्था झाली असुन या मार्गाने होणारी शेतमाल वाहतुक बंद झाल्याने त्रास सहन करावा लागत आहे

लोकमत न्यूज नेटवर्ककळवण : गेल्या दोन वर्षापासुन शिरसमणी-साकोरे रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असुन या मार्गाने होणारी शेतमाल वाहतुक पुर्णपणे बंद झाल्याने शेतकरी बांधवांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.रस्ता सुधारण्याची वारंवार मागणी करु नही दुर्लक्ष होत असल्याने नागरीकांनी नाराजी व्यक्त केली असुन लवकरात लवकर ह्या रस्त्याची सुधारणा करण्याची मागणी शेतकरी व नागरीकांनी केली आहे. शिरसमणी ते साकोरे हा रस्ता अंदाजे तीन किलोमीटरचा असुन शिरसमणी,दह्याणे,कुंडाणे,भुसणी,ओतुर,जिरवाडे या गावातील शेतकरी आपला भाजीपाला व कांदा विक्र ीसाठी वणी व नाशिक येथील कृषी उत्पन्न बाजार समतिीमध्ये घेवुन जाण्यासाठी मुख्यत्वा:ह याच रस्त्याचा वापर करतात.मात्र गेल्या दोन वर्षापासुन रस्त्याच्या झालेल्या दुर्दशेमुळे या रस्त्याने होणारी वाहतुक पुर्णपणे बंद झालेली आहे. हा रस्ता तीन ते चार ठिकाणी खचला असुन अपघात होण्याची शक्यता आहे.जड वाहतुकीमुळे बहुतांश ठिकाणी खड्डे पडले असुन वाहन चालवणे जिकीरीचे झाले आहे.शेतकरी बांधवांना शेतमाल विक्र ीसाठी नेतांना धोकादायक परिस्थितीचा सामना करावा लागत असुन रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या काटेरी झुडपांमुळे रस्ता अक्षरश: शोधावा लागत असल्याची परिस्थिती आहे. गत दोन वर्षापासुन या रस्त्याच्या दुरु स्तीची मागणी केली असुन सार्वजनिक बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याने शेतकरी बांधवांनी नाराजी व्यक्त केली आहे. या रस्त्याची त्वरीत दुरु स्ती करण्याची मागणी संदिप शिरसाठ, श्रीकांत वाघ, प्रशांत चव्हाण, संदिप सावकार,सुरेश वाघ आदींसह शेतकरी बांधवांनी केली आहे.विद्यार्थ्यांना करावी लागतेय पायपीट-रस्त्याच्या दुरावस्थेमुळे विद्यार्थी वाहतुक करणारी वाहने या रस्त्याला येत नसल्याने शालेय विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी पायपीट करावी लागत असुन रस्ता खराब असल्याने विद्यार्थ्यांचे देखील हाल होत आहेत.रस्त्याच्या या अवस्थेमुळे विद्यार्थी,शेतकरी व नागरीक या सर्वच घटकांना समस्या भेडसावते आहे.