शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

निधीची लालूच दाखवत करवाढीचा बोजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 00:32 IST

७५ लाख रुपयांचा नगरसेवक निधी देण्याची लालूच दाखवत प्रशासनाने नागरिकांवर घरपट्टी व पाणीपट्टीच्या माध्यमातून करवाढ लादली असल्याचा आरोप माजी महापौर दशरथ पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला. सदर करवाढ फेटाळून लावण्यासाठी सर्व नगरसेवकांनी सभागृहात आंदोलनाचा पवित्रा घ्यावा, असे आवाहनही पाटील यांनी केले.

नाशिक : ७५ लाख रुपयांचा नगरसेवक निधी देण्याची लालूच दाखवत प्रशासनाने नागरिकांवर घरपट्टी व पाणीपट्टीच्या माध्यमातून करवाढ लादली असल्याचा आरोप माजी महापौर दशरथ पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला. सदर करवाढ फेटाळून लावण्यासाठी सर्व नगरसेवकांनी सभागृहात आंदोलनाचा पवित्रा घ्यावा, असे आवाहनही पाटील यांनी केले.दशरथ पाटील यांनी करवाढीचा निषेध करत सांगितले, महापालिकेच्या इतिहासात एवढी मोठी करवाढ होत असताना विरोधक केवळ बोलघेवडेपणा करत आहेत. नागरिकांनी त्यांना प्रश्न सोडविण्यासाठी सभागृहात पाठविले आहे. त्यामुळे, नगरसेवकांनी सभागृहाच्याच माध्यमातून कठोर भूमिका घेत करवाढीचा निर्णय हाणून पाडावा. यापूर्वी, जेएनएनयूआरएमच्या योजनेच्या अंमलबजावणीप्रसंगीही करवाढ लादण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु तो हाणून पाडण्यात आला होता. आता स्मार्ट सिटीच्या नावाखाली पुन्हा करवाढीचे भूत नागरिकांच्या मानगुटीवर बसविण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. या करवाढीला नागरिकांचा कडाडून विरोध आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी संगनमत करत नागरिकांच्या खिशाला झळ पोहोचविण्याचा डाव रचला आहे. वास्तविक, प्रशासनाकडून देण्यात येणारा ७५ लाख रुपयांचा नगरसेवक निधी हा कायद्यात बसत नाही. परंतु, गेल्या आठ महिन्यांचा कारभार पाहता नियम व कायद्याचे धिंडवडे काढले जात आहेत. सत्ताधारी व विरोधक एकाच माळेचे मणी आहेत. नागरिकांचे प्रतिनिधित्व करणाºयांनी सभागृहात या करवाढीला कडाडून विरोध करत ती फेटाळून लावावी, अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा मार्ग मोकळा असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले.