शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

नांदूरशिंगोटे परिसरात पिण्याच्या पाण्याची टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:13 IST

सिन्नर: नांदूरशिंगोटे परिसरात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असून, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न उपस्थित झाला आहे. नांदुरशिंगोटे गट व ...

सिन्नर: नांदूरशिंगोटे परिसरात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असून, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न उपस्थित झाला आहे. नांदुरशिंगोटे गट व गणातील विहिरींची भूजल पातळी खालावली असून, ठिकठिकाणी बंधारे पूर्णतः कोरडे झाले आहेत. भोजापूर धरणात अजूनही पुरेसा उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून, कालव्याद्वारे पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी पंचायत समितीच्या सभापती शोभा बर्के यांनी तहसीलदार राहुल कोताडे यांच्याकडे केली आहे. याबाबत दीपक बर्के यांनी मागणीचे पत्र दिले.

माजी आमदार राजाभाऊ वाजे, शिवसेनेचे युवा नेते उदय सांगळे यांनी सभापती बर्के यांना याबाबत सूचना केली होती. परिणामी, नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. जनावरांनाही पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यामुळे भोजापूर परिसरातील गावांना कालव्याद्वारे पाणी सोडावे, अशी मागणी सभापती बर्के यांनी केली आहे.

नांदुरशिंगोटेसह कणकोरी, मानोरी, निऱ्हाळे, मऱ्हळ खुर्द, मऱ्हळ बुद्रुक, दोडी खुर्द, दोडी बुद्रुक, खंबाळे, माळवाडी, पांगरी आदी ११ गावांतील बंधारे भरण्याची मागणी करण्यात आली. कालव्याद्वारे पाणी सोडून बंधारे भरण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे पावसाळ्यापर्यंत टंचाईवर मात करणे शक्य होणार आहे.

--------------------

१३५ दलघफू साठा शिल्लक

धरणाची क्षमता ३६१ दशलक्ष घनफूट असून, यंदा भोजापूर धरणात १३५ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा अजूनही शिल्लक आहे. धरण बांधल्यानंतर प्रथमच भर उन्हाळ्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. दरवर्षी जेमतेम दोन ते तीन टक्के पाणीसाठा शिल्लक राहतो. धरणावर अवलंबून असलेल्या पाणी योजनांचा विचार केला, तरी त्यांच्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे मागणीनुसार उन्हाळी आवर्तन सोडले, तरी त्याचा पाणीपुरवठा योजनांवर कोणताही परिणाम होणार नाही. उन्हाळी आवर्तन सोडल्यास धरणाच्या इतिहासात प्रथमच उन्हाळी आवर्तन सुटणार आहे.

----------------------

सिन्नर तालुक्यातील भोजापूर धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी पाणी सोडण्याच्या मागणीचे पत्र तहसीलदार राहुल कोताडे देताना दीपक बर्के. (१४ सिन्नर १)

===Photopath===

140421\14nsk_25_14042021_13.jpg

===Caption===

१४ सिन्नर १