शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

सजावटीसाठी कारागिरांची शहरात कमतरता

By admin | Updated: August 13, 2014 00:41 IST

गणेशोत्सव : परजिल्ह्यातून देखाव्यांसह कारागिरांचीही आयात; मूर्तीही येतायेत मुंबईतून

मनोज मालपाणी ल्ल नाशिकरोडगणेशोत्सवासाठी चलत देखावे, आरास बनविणाऱ्या मूर्तिकार, कलाकारांची संख्या घटल्याने शहरातील गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना देखाव्यासाठी इतर जिल्ह्यांत फिरण्याची वेळ आली आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नगर येथील डेकोरेशनचे सेट महागडे मिळत असल्याने यंदा कोणता देखावा उभारावा, असा प्रश्न मंडळाच्या कार्यकर्त्यांपुढे निर्माण झाला आहे. शहर परिसरात काही वर्षांपूर्वी अनेक मूर्तिकार भव्य चलत डेकोरेशन सेट तयार करीत होते. थर्माकॉलचेदेखील भव्य सुंदर देखाव्यांचे सेट उभारत होते. मात्र गणेशोत्सव, नवरात्रोत्सव देखाव्यांवर वर्षभराचा संसाराचा गाडा हाकणे कठीण झाल्याने मूर्तिकार देखावे बनविण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. त्याचप्रमाणे खरेदी केलेला देखावा, मूर्ती वर्षभर सांभाळून ठेवणे जागेअभावी मंडळांनादेखील अडचणीचे होऊ लागल्यात्यांनी ही देखावे विकत घेणे टाळले आहे. तसेच प्लॅस्टर आॅफ पॅरिसमध्ये बनविलेल्या मूर्ती वजनाने जड व नाजूक असल्याने मंडळांनीदेखील प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या देखाव्यांना नापसंती दाखवत फायबरमध्ये बनविलेले देखावे तसेच मूर्ती घेण्यास सुरुवात केली आहे. भाडेतत्त्वावर देखावेफायबरमध्ये बनविलेली मूर्ती, देखावा, आर्थिकदृष्ट्या महागात पडत असल्याने मूर्तिकार, कलाकारांकडून ती गणेशोत्सव काळात भाडेतत्त्वावर देण्यात येऊ लागली. मात्र फायबरमधील मूर्ती, देखाव्याकरिता मूर्तिकारांना मोठी आर्थिक गुंतवणूक करावी लागते. शिवाय जागेची गरज व सहकलाकार, मूर्तिकारांची गरजही लागते. फायबरच्या मूर्ती व देखाव्यासाठी लागणारी मोठी आर्थिक गरज, जागा, सहकारी कलाकारांचा तुटवडा अशा अनेक कारणांमुळे गणेशोत्सवाचे देखावे, आरास तयार करणारे मूर्तिकार, कलाकार गेल्या काही वर्षांत कमी होऊ लागले आहेत. शहरात हातावर मोजण्याइतकेच मूर्तिकार देखावे आरास तयार करण्याचे काम करीत आहेत. यामुळे शहरातील मंडळांना यंदा गणेश उत्सव देखावा, आरास मिळणे अवघड झाल्याने मंडळाच्या कार्यकर्त्यांना जिल्ह्याच्या ग्रामीण भागात तसेच मुंबई, ठाणे, कल्याण, नगर, पुणे आदि ठिकाणी वणवण भटकण्याची पाळी आली आहे. गणेशोत्सव १५ दिवसांवर येऊन ठेपला असून, बहुतांश मंडळांना अद्यापही देखावा न मिळाल्याने ‘यंदा काय करावे’ असा प्रश्न मंडळ व कार्यकर्त्यांपुढे उभा राहिला आहे.