शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

कौळाणेत पाण्यासाठी ‘शोले स्टाईल’ आंदोलन

By admin | Updated: March 19, 2017 23:27 IST

पाणीटंचाई : गिरणा- उजवा कालवा पाणी आरक्षण कृती समिती आक्रमक

मालेगाव : तालुक्यातील सौंदाणेसह अकरा गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी पूनद धरणातुन गिरणा उजव्या कालव्याला पाणी सोडण्यात आले. मात्र सदरचे पाणी केवळ सौंदाणे गावापर्यंतच पोहचले. उर्वरित अकरा गावांना पाणीच मिळाले नसल्यामुळे गिरणा उजवा कालवा पाणी आरक्षण कृती समिती आक्रमक झाली आहे. तालुक्यातील कौळाणे येथील जलकुंभावर चढून समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शोले स्टाईल आंदोलन सुरू केले आहे. पाण्याचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या आंदोलनामुळे सौंदाणेसह अकरा गावांचा पाणीप्रश्न चिघळला आहे. दरम्यान, आंदोलनस्थळी प्रांताधिकारी अजय मोरे, गटविकास अधिकारी आनंद पिंगळे यांनी धाव घेवून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. आंदोलन मागे घ्या असे सांगितले. मात्र आंदोलनकर्ते त्यांच्या भूमिकेवर ठाम असल्यामुळे आंदोलन रात्री उशिरापर्यंत सुरूच होते.तालुक्यातील सौंदाणेसह नांदगाव, वाके, मुंगसे, टाकळी, मांजरे, शिरसोंडी, सोनज, कौळाणे, नगाव, वऱ्हाणे आदि गावांचा पाणीप्रश्न सुटावा यासाठी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठपुरावा केला होता. या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी अजय मोरे यांनी सौंदाणेसह टंचाईग्रस्त गावांची पाहणी करुन सद्यस्थितीतील उपलब्ध जलस्त्रोतांचा आढावा घेतला होता. त्यानंतर पूनद धरणातुन गिरणा उजव्या कालव्याला पाणी सोडण्यात आले होते. मात्र सदरचे पाणी केवळ सौंदाणे गावापर्यंतच पोहचले. उर्वरित गावांना पाणीच मिळाले नसल्यामुळे समितीच्या पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यातील कौळाणे येथे जलकुंभावर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घ्यावे यासाठी प्रांताधिकारी मोरे, गटविकास अधिकारी पिंगळे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला; मात्र आंदोलक त्यांच्या भूमिकेवर ठाम असल्यामुळे रात्री उशिरापर्यंत आंदोलन सुरूच होते. या आंदोलनात पंचायत समितीचे माजी सभापती भरत पवार, बाजार समितीचे संचालक संग्राम बच्छाव, अध्यक्ष पंकज गायकवाड, समाधान शेवाळे, कौतिक सोनवणे, शिवाजी पवार, रमेश बच्छाव, सचिव भरत पवार, नितीन निकम यांच्यासह लाभ क्षेत्रातील शेतकरी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)