शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेची मुसंडी, राष्ट्रवादीच्या जागा घटल्या

By admin | Updated: February 24, 2017 00:53 IST

शिवसेनेची मुसंडी, राष्ट्रवादीच्या जागा घटल्या

 नाशिक : गेल्या दीड दशकापासून सत्तेवर असलेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेसला अखेर गुरुवारच्या (दि.२३) निकालामुळे पायउतार व्हावे लागण्याची चिन्हे आहेत. सर्वांत मोठा पक्ष म्हणून शिवसेनेने मुसंडी मारत २५ जागांवर विजय मिळवित सत्तेकडे आगेकूच केली आहे, तर चार जागांवर थेट पंधरा जागांवर विजय मिळवित भाजपाने शिवसेनेला सत्तेत सोबत जाण्याकडे वाटचाल सुरू केली आहे.शिवसेनेचे सर्वात धक्कादायक निकाल मालेगाव, नाशिक व निफाडसाठी लागले. मालेगाव येथून सातपैकी अवघ्या दोन गटांतून झोडगे, वडनेर खाकुर्डी गटातून शिवसेनेला, तर निमगाव, कळवाडी, सौंदाणे, दाभाडी व रावळगाव गटातून भाजपाने विजय मिळवित मुसंडी मारली. निफाड तालुक्यातील दहा गटांपैकी पाच गटांवर राष्ट्रवादी कॉँग्रेसने विजय मिळविला. येथून आमदार अनिल कदम यांना हा धक्का मानला जात आहे. चांदोरी, देवगाव, पालखेड, सायखेडा, विंचूर गटात राष्ट्रवादी कॉँग्रेसने विजय मिळविला, तर उगाव, पिंपळगाव व कसबेसुकेणे गटावर शिवसेनेचा भगवा फडकला. सिन्नर तालुक्यातील सहापैकी पाच जागांवर शिवसेनेने मुसंडी मारत नगरपालिका निवडणुकीची परंपरा कायम राखली. देवपूर या एकमेव भाजपाचा गट वगळता चास, नायगाव, ठाणगाव, मुसळगाव व नांदुरशिंगोटे गटातून शिवसेनेचे उमेदवार निवडून आले आहेत. इगतपुरी तालुक्यातील पाचपैकी नांदगाव सदो, शिरसाटे, खेड गटातून शिवसेनेचे, तर घोटी व वाडीवऱ्हेतून राष्ट्रवादी व कॉँग्रेसचे उमेदवार निवडून आले. नाशिक तालुक्यात शिवसेनेचे जबरदस्त पिछेहाट होत पळसे, गोवर्धन, गिरणारे गट राष्ट्रवादीच्या ताब्यात तर पळसे गटातून सेनेचे बंडखोर शंकर धनवटे अपक्ष म्हणून निवडून आले. त्र्यंबकेश्वर तालुक्यातून अंजनेरीतून कॉँग्रेस, ठाणापाडातून माकपा, तर हरसूल गटातून राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार निवडून आले. सुरगाणा तालुक्यातून भवाडा व गोेंदुणे गटातून माकपा, तर हट्टी गटातून भाजपाचे उमेदवार निवडून आले. कळवण तालुक्यातील कनाशी, मानूर व खर्डेदिघर गटातून राष्ट्रवादी तर अभोणा गटातून कॉँग्रेसने जागा जिंकली. दिंडोरी तालुक्यातील अहिवंतवाडी, कसबेवणी, मोहाडी, खेडगाव येथून शिवसेना, तर उमराळे व कोचरगाव गटातून कॉँग्रेसने विजय मिळविला. देवळा तालुक्यातून लोहणेर येथून भाजपा, तर उमराणे व वाखारी गटातून राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले. बागलाण तालुक्यातून नामपूर, वीरगाव, ठेंगोडा, ब्राह्मणगाव गटातून भाजपा, तर जायखेडा गटातून राष्ट्रवादी व ताहाराबाद गटातून अनुक्रमे राष्ट्रवादी व कॉँग्रेसने जागा जिंकली. पठावे दिघर गटातून अपक्ष आदिवासी क्रांतिसेनेने जागा जिंकली. (प्रतिनिधी)