शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
4
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
5
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
6
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
7
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
8
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
9
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
10
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
11
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
12
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
13
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
14
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
15
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
16
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
17
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
18
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
19
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
20
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शिवानी दुर्गा दावा दाखल करणार

By admin | Updated: September 16, 2015 23:30 IST

धर्माचार्य पदवीला आनंद आखाड्याचा आक्षेप

त्र्यंबकेश्वर : आपणाला धर्माचार्य ही पदवी देणाऱ्या आणि पट्टाभिषेक झाल्यानंतर अचानक जागे झालेल्या आनंद आखाड्याच्या रमता पंचने तीन दिवसांत लेखी माफी न मागितल्यास मानहानीचा दावा दाखल करण्याचा इशारा शिवानी दुर्गा यांनी दिला आहे.सागरानंद महाराज यांनी शिवाजी दुर्गासह तीन साधूंना बहाल केलेल्या पदव्यांना आनंद आखाड्याने आक्षेप घेतल्यानंतर शिवानी दुर्गा यांनी आनंद आखाड्यावर टीका केली. धर्माचार्य पदवी बहाल करून कित्येक दिवस झाल्यानंतर आनंद आखाड्याच्या रमता पंचला आताच जाग का आली, असा सवालही त्यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. येथील साधुग्राममध्ये सर्वेश्वरी आश्रमात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या पुढे म्हणाल्या की, मला दिलेली पदवी काढून घेण्यात येत असल्याची माहिती प्रसारमाध्यमांद्वारे समजली. यामुळे आपल्या आत्मसन्मानाला मोठा धक्का बसला आहे. जर रमता पंच सर्व निर्णय घेत असेल तर आनंद आखाडा पदवी देतो आहे हे त्यांना समजत नाही का? या दोघांच्या एकमेकांशी ताळमेळ नाही का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आपली पदवी का काढून घेतली जात आहे? यात आपला काय दोष आहे, हाही प्रश्न निर्माण झाल्याचे शिवानी दुर्गा यांनी म्हटले आहे. असे काय झाले की अचानक धर्माचार्य पदाला आपण लायक नसल्याचा साक्षात्कार आनंद आखाड्याला झाला. त्यांनी पदव्या निष्कासित केल्यामुळे आपली प्रतिष्ठा पणाला लागली असून, आपली फसवणूक करणाऱ्यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली. पदवी बहाल झाल्यानंतरच आपणाला ओळख मिळाली असे नव्हे तर अनेक वर्षांपासून आपण धर्मप्रसाराचे काम करत असल्यामुळे आपली ओळख आहे, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)