शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

कॉँग्रेसपुढे शिवसेनेचे कडवे आव्हान

By admin | Updated: February 16, 2017 00:36 IST

अग्निपरीक्षा : गट ताब्यात घेण्यासाठी कसरत

घोटी : शिवसेनेला कायम हुलकावणी देणाऱ्या नांदगाव सदो गटाला ताब्यात घेण्यासाठी शिवसेना पुन्हा सज्ज झाली असून, कॉँग्रेसपुढे शिवसेनेचे कडवे आव्हान राहणार आहे. अनुसूचित जमातीकरिता आरक्षित असलेल्या या गटात शिवसेनेच्या अपेक्षा पुन्हा उंचावल्या आहेत.काही काळापूर्वी शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणारा हा गट दशकांपूर्वी काँग्रेस पक्षाने आपल्या ताब्यात घेतला होता. दरम्यान, दोन्ही निवडणुकांत काँग्रेस आणि शिवसेनेत अटी-तटीच्या लढती होत काँग्रेसने बाजी मारली होती. या गटातून प्रारंभी जनार्दन माळी आणि त्यानंतर त्यांच्या पत्नी बेबी माळी या निवडून आल्या होत्या.या निवडणुकीतही मर्यादित उमेदवार ठेवण्याची परंपरा गटाने कायम राखली आहे. शिवसेना, भाजपा, काँग्रेस व राष्ट्रवादी यांनी परस्पर विरोधी आव्हान उभे केले आहे. असे असले तरी खरी लढत ही कॉँग्रेस आणि शिवसेनेतच रंगणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पूर्वी तालुक्यातील इतर पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात शिवसेनेत दाखल झाल्याने तसेच हा गट पूर्वीपासूनच शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने हा गड पुन्हा राखू असा विश्वास शिवसेना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे, तर काँग्रेसच्या ताब्यात असलेला गट पुन्हा काँग्रेसच ताब्यात घेईल, असा विश्वास काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मात्र एकेकाळी भाजपाला ही झुकते माप देणाऱ्या या गटात पुन्हा एकदा भाजपा बाजी मारेल असा विश्वास भाजपा पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.नांदगाव सदो व काळुस्ते या दोन गणांचा समावेश असणाऱ्या या गटातील मतदार मोठ्या प्रमाणात दुर्गम भागात राहतात. याच गटातील काळुस्ते गणातील काँग्रेसच्या ठकूबाई सावंत यांना सभापती होण्याचा मान मिळाला होता. मात्र उमेदवारी मिळाली नसल्याने त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. दरम्यान, या गटात बंडखोरी व मतविभाजन यामुळे शिवसेना आणि काँग्रेस यात काट्याची लढत होणार असून, काँग्रेससाठी गटातील निवडणूक म्हणजे अग्निपरीक्षा ठरणार आहे.