शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेकडून रेमडेसिविरची गरज विशद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:14 IST

रेमडेसिविर इंजेक्शनच्या वितरणात गेल्या काही दिवसांत झालेला सावळागोंधळ, एका रुग्णालयाकडे सापडलेला एक हजार इंजेक्शनचा पुरवठा आणि रुग्ण व ...

रेमडेसिविर इंजेक्शनच्या वितरणात गेल्या काही दिवसांत झालेला सावळागोंधळ, एका रुग्णालयाकडे सापडलेला एक हजार इंजेक्शनचा पुरवठा आणि रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना भोगाव्या लागत असलेल्या नरकयातना या पार्श्वभूमीवर बडगुजर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. शिवसेनेच्या विभागप्रमुखांनी आपापल्या विभागातील रुग्णालयांना भेटी देऊन माहिती घेतली असता महानगरात महापालिका रुग्णालय तसेच शासकीय रुग्णालय वगळता खाजगी रुग्णालयांसाठी ३५०० रेमडेसिविर इंजेक्शनची तातडीने आवश्यकता असल्याचे निदर्शनास आले असून, त्याची माहिती देण्यात आली. रेमडेसिविरच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचेही या वेळी सांगण्यात आले. असे असले तरी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नियोजन सुरळीत होते किंवा नाही याची खातरजमा प्रत्येक रुग्णालयात जाऊन शिवसेना पदाधिकारी करतील, असेही बडगुजर यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणले. शिष्टमंडळात शिवसेनेचे योगेश बेलदार, देवा जाधव, सुनील जाधव, सचिन बांडे, शैलेश सूर्यवंशी, मसूद जिलानी, सागर कर्पे, सागर निकाळे, सुनील निरगुडे, महेंद्र बडवे, वीरेंद्र टिळे, संजय परदेशी, पवन मटाले, सुरेश पाटील, मयूर परदेशी, नरेश सोनवणे, प्रमोद नाथेकर आदी उपस्थित होते. (फोटो १४ शिवसेना)