शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
5
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
6
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
7
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
8
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
9
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
10
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
11
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
12
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
13
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
14
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
15
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
16
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
17
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
18
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
19
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
20
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना - भाजपाकडून ५१ नगरसेवक रिंगणात

By admin | Updated: February 5, 2017 22:54 IST

२९ आयारामांना संधी : पक्षाच्या २२ नगरसेवकांना उमेदवारी

नाशिक : महापालिका निवडणुकीत सेना-भाजपाकडून तब्बल ५१ विद्यमान नगरसेवक पुन्हा आपले नशीब आजमावणार आहेत. शिवसेनेने आपल्या १६, तर भाजपाने ६ नगरसेवकांना उमेदवारी दिली आहे, तर अन्य पक्षांतून सेनेत दाखल झालेल्या १५, तर भाजपात दाखल झालेल्या १४ आयाराम नगरसेवकांना उमेदवारी करण्याची संधी देण्यात आली आहे. सेना-भाजपाकडून प्रत्यक्ष किती नगरसेवकांच्या गळ्यात पुन्हा विजयमाला पडेल, याबाबत आता उत्सुकता ताणून राहील. महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना व भाजपा हे दोन्ही पक्ष स्वबळावर लढणार आहेत. त्यानुसार दोन्ही पक्षांनी आपले उमेदवार घोषित केले आहेत. त्यात शिवसेना वा भाजपाने बव्हंशी नगरसेवकांना पुन्हा उमेदवारी बहाल केलेली आहे. त्यात भाजपाने विद्यमान नगरसेवक रंजना भानसी, दिनकर पाटील, प्रा. कुणाल वाघ, सुनंदा मोरे, संभाजी मोरुस्कर, सतीश कुलकर्णी यांना उमेदवारी दिली आहे, तर फुलाबाई बोडके यांच्याऐवजी त्यांचे सुपुत्र कमलेश बोडके यांना, तर शालिनी पवार यांच्याऐवजी त्यांचे पती अरुण पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सविता दलवाणी, सिंधू खोडे, परशराम वाघेरे व ज्योती गांगुर्डे यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे खोडे वगळता अन्य तिघांनी अन्य पक्षांची उमेदवारी मिळविली आहे. भाजपाने मात्र अन्य पक्षातून ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपात प्रवेश करणाऱ्या उद्धव निमसे, रुची कुंभारकर, दामोदर मानकर, रेखा बेंडकुळे, शशिकांत जाधव, शिवाजी गांगुर्डे, माधुरी जाधव, अर्चना थोरात, कन्हैया साळवे, संगीता गायकवाड, कोमल मेहरोलिया, दीपाली कुलकर्णी, सतीश सोनवणे व सुदाम कोंबडे या आयारामांना उमेदवारी बहाल केली आहे. शिवसेनेने मनीषा हेकरे, अजय बोरस्ते, विलास शिंदे, सचिन मराठे, शैलेश ढगे, सूर्यकांत लवटे, नयना घोलप, केशव पोरजे, सुनीता कोठुळे, कल्पना पांडे, सुधाकर बडगुजर, हर्षा बडगुजर, उत्तम दोंदे, शोभा फडोळ, डी. जी. सूर्यवंशी आणि वंदना बिरारी यांना पुन्हा संधी दिली आहे. विनायक पांडे यांनी घरातच चार तिकिटे मागितल्याने राडेबाजी होऊन त्याची दखल पक्षाने घेतली. त्यामुळे विनायक पांडे लढतीत नसतील. कोमल मेहरोलिया यांनी भाजपात प्रवेश केला आहे, तर शिवाजी सहाणे यांनी पुन्हा निवडणूक न लढविण्याची घोषणा यापूर्वीच केली आहे. शिवसेनेने यतिन वाघ, योगीता अहेर, नंदिनी जाधव, विजय ओहोळ, मंगला आढाव, रंजना बोराडे, अशोक सातभाई, रमेश धोंगडे, कल्पना चुंभळे, शीतल भामरे, सुवर्णा मटाले, रत्नमाला राणे, अरविंद शेळके, शेख रशीदा, संजय चव्हाण या पक्षबदलूंना उमेदवारी बहाल केली आहे. तब्बल ४१ टक्के नगरसेवक हे सेना-भाजपाकडून पुन्हा नशीब आजमावत आहे. त्यातील किती जणांच्या गळ्यात पुन्हा विजयमाला पडते, हे २३ फेबु्रवारीला समोर येईलच. (प्रतिनिधी)भाजपाने एकूण २०, तर शिवसेनेने एकूण ३१ नगरसेवकांना पुन्हा उमेदवारी दिलेली आहे. याशिवाय काही माजी नगरसेवकांनाही उमेदवारी बहाल करण्यात आलेली आहे. त्यामुळे  सेना-भाजपाला स्वबळावर अनेक नवीन चेहऱ्यांना निवडून आणण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे. बहुमतासाठी आवश्यक ६२ आकडा स्वबळावर पार करण्यासाठी सेना-भाजपाला मोठी कसरत करावी लागणार आहे.