शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नरहून चोरलेली बुलेट चोरट्यासह शिर्डीला सापडली

By admin | Updated: November 1, 2014 22:36 IST

प्रसंगावधानामुळे दुचाकी चोर ताब्यात

 सिन्नर : येथील देवीमंदिर रस्त्यावरील बंगल्यासमोर उभी असलेली नवी कोरी बुलेट चोरून नेणाऱ्या चोरट्याला गाडीमालकाच्या प्रसंगावधानामुळे अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले. गुरुवारी रात्री सिन्नर येथून चोरीला गेलेली बुलेट शिर्डी येथे शुक्रवारी चोरट्यासह सापडली.येथील भांड्यांचे प्रसिद्ध व्यापारी सोपान भगीरथ लोणारे यांचा देवीमंदिर रस्त्याच्या कडेला बंगला आहे. लोणारे यांच्याकडे दोन बुलेट असून, त्या बंगल्यासमोर उभ्या असतात. एकत्रित कुटुंबामुळे या दुचाकींच्या चाव्या बंगल्याच्या जिन्यात लावलेल्या असतात. याचा फायदा चोरट्याने घेतला. गुरुवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास संशयित आरोपी सुनील भैरवनाथ साबळे (२६) याने लोणारे यांच्या बंगल्यासमोर उभी असलेली काळ्या रंगाची चार महिन्यांपूर्वीच खरेदी केलेली बुलेट (क्र. एमएच १५ इक्यू २२०) सुुरू करून पळवून नेली. बुलेट चोरीला गेल्याचे १५ ते २० मिनिटात लोणारे यांच्या निदर्शनास आले. लोणारे यांनी शिर्डीचा मित्रपरिवार व पोलिसांच्या मदतीने बुलेटचा शोध सुरू केला. याचवेळी त्यांना संशयित आरोपी साबळे बुलेटसह मिळून आला. त्याने नंबर प्लेटवरील क्रमांक खोडून टाकला होता तसेच बुलेटचे आरसे विकून टाकल्याचे आढळून आले. शिर्डी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर लोणारे यांना कळविण्यात आले. लोणारे यांनी सिन्नर पोलिसात बुलेट चोरीला गेल्याची फिर्याद नोंदविली होती. सिन्नर पोलिसांसह लोणारे शिर्डीला रवाना झाले. बुलेटच्या चेसी क्रमांकाहून बुलेटची ओळख पटली. याप्रकरणी संशयित आरोपी सुनील भैरवनाथ साबळे मूळ राहणार शिरवळ, ता. खंडाळा, जि. सातारा व हल्ली राहणारा राजवाडा, सिन्नर याच्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक किशोर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजय गायकवाड अधिक तपास करीत आहेत.(वार्ताहर)