शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याकडून शेळीचा फडशा

By admin | Updated: March 24, 2017 23:18 IST

इगतपुरी : तालुक्यातील अत्यंत दुर्गम व आदिवासी भागातील चिंचलेखैरे येथे बिबट्याने पहाटेच्या सुमारास मंडलिक उघडे यांच्या घराशेजारील शेळ्यांच्या गोठ्यात हल्ला करून एका शेळीचा फडशा पाडला.

इगतपुरी : तालुक्यातील अत्यंत दुर्गम व आदिवासी भागातील चिंचलेखैरे येथे बिबट्याने पहाटेच्या सुमारास मंडलिक उघडे यांच्या घराशेजारील शेळ्यांच्या गोठ्यात हल्ला करून एका शेळीचा फडशा पाडला. तालुक्यात बिबट्याची दहशत चिंताग्रस्त बनत चालली असून, कधी बिबट्या नागरिकांवर हल्ला तर कधी मुक्या जनावरांवर हल्ला करील याची शाश्वती राहिलेली नाही. पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास बिबट्याने शेळीच्या गोठ्यात जाऊन अचानक हल्ला केला, मात्र अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे शेळ्यांनी आरडाओरड आणि कुत्रे भुंकत असल्याने मंडलिक उघडे यांच्या पत्नी भोराबाई उघडे यांनी सर्व परिस्थितीचा अंदाज घेत बिबट्या आल्याचे लक्षात येताच मोठमोठ्याने आरडाओरड केली. त्यामुळे बिबट्याने पलायन केले.  दरम्यान, गेल्या पंधरवड्यात बारशिंगवे, आशाकिरणवाडी परिसरातदेखील युवकावर बिबट्याने हल्ला केला होता. ही घटना ताजी असताना आता आदिवासी, दुर्गम भागातील नागरिक प्रचंड भीतीच्या सावटाखाली वावरत आहेत. येथील आदिवासी भागात राहणाऱ्या नागरिकांमध्ये बिबट्याच्या मुक्त संचारामुळे प्रचंड भीतीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी या भागात बिबट्या घरातदेखील शिरला होता. सुदैवाने कुणावरही हल्ला किंवा जीवितहानी टळली होती. मात्र आज पुन्हा बिबट्याचे दर्शन झाल्याने आदिवासी नागरिक भयभित झाले आहेत.  दरम्यान, परिसरात वाढलेल्या बिबट्याच्या दहशतीला आळा घालण्यासाठी वनविभागाने या परिसरात लवकरात लवकर पिंजरा लावावा, अशी मागणी जोर धरत आहे. (वार्ताहर)