शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

शताब्दी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याचा कालव्यात बुडून मृत्यू

By admin | Updated: February 18, 2017 00:22 IST

आगासखिंड : पाण्याचा अंदाज न आल्याने दुर्घटना

नाशिक : महाविद्यालयाजवळ असलेल्या कडवा कालव्यात मित्रांसह पोहोण्यास गेलेल्या शताब्दी महाविद्यालयातील विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि़१७) दुपारच्या सुमारास घडली़ मयत विद्यार्थ्याचे नाव आकाश नंदू दरेकर (१९, डॉ़ घाडगे हॉस्पिटल मागे) असे असून, तो सातपूरच्या कामगारनगरमधील रहिवासी आहे़ दरम्यान, या घटनेची सिन्नर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़  सिन्नर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आगासखिंड येथील शताब्दी इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशनच्या द्वितीय वर्षातील विद्यार्थी आकाश दरेकर हा आपल्या दोघा मित्रांसह दुपारी २ वाजेच्या सुमारास महाविद्यालयाजवळील कडवा कालव्यात पोहोण्यासाठी गेले होते़ या कालव्याजवळ गेल्यानंतर हे तिघेही कालव्यात पोहोण्यासाठी उतरले, त्यापैकी दोन जण बाहेर आले मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने आकाश हा पाण्यात बुडाला व त्याचा मृत्यू झाला़  महाविद्यालयाजवळील कडवा कालव्यात बुडालेल्या आकाशचा मृतदेह सुरुवातील सापडत नव्हता, मात्र त्यानंतर तो आढळून आला़ दरम्यान, सायंकाळच्या सुमारास आकाशचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला़ मयत आकाशचे वडील नंदू दरेकर हे गोंदे येथील सॅमसोनाइट कंपनीत नोकरीस असून, आकाश हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता़ त्याच्या पश्चात आई, वडील व एक बहीण असा परिवार आहे़ (प्रतिनिधी)