शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
4
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
5
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
6
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
7
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
8
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
9
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
10
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
11
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
12
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
13
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
14
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
15
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
16
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
17
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
18
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
19
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
20
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील

राष्ट्रवादीसाठी शरद पवार उतरणार रणांगणात

By admin | Updated: January 1, 2017 00:00 IST

राष्ट्रवादीसाठी शरद पवार उतरणार रणांगणात

नाशिक : जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आजी-माजी लोकप्रतिनिधी तसेच पदाधिकारी एका पाठोपाठ कायदेशीर चौकटीत अडकत असताना सैरभैर झालेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेसचे डॅमेज कंट्रोल सावरण्यासाठी स्वत: पक्षाध्यक्ष माजी केंद्रीयमंत्री शरद पवार नाशिकला येणार आहेत. जिल्हा परिषदेत सत्तेवर असलेल्या राष्ट्रवादीसमोर सत्तेत टिकण्याचे प्रमुख आव्हान आहे. शनिवारी (दि.३१) यासंदर्भात राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीत ५ जानेवारीला शरद पवार यांच्या उपस्थितीत पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात हा शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून इच्छुक असलेल्यांनाही बोलविण्यात आले असून, मेळाव्यानंतर प्रमुख नेत्यांशी शरद पवार चर्चा करणार असल्याचे समजते. ४ जानेवारीलाच शरद पवार नाशिक मुक्कामी येत असून, त्यात आगामी महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांबाबत प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे समजते. माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांनी जिल्ह्णात राष्ट्रवादीच्या ताब्यात महत्त्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्था व सहकारी संस्था कशा राहतील, हे पाहिले होते. मात्र त्यांना व माजी खासदार समीर भुजबळ यांना अटक झाल्यानंतर काही महिन्यांपासून राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये काहीसे वातावरण सैरभैर झाले होते. त्यातच काही दिवसांपूर्वी माजी खासदार कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती देवीदास पिंगळे, शहर कार्याध्यक्ष छबू नागरे, रामराव पाटील यांनाही अटक झाल्यानंतर राष्ट्रवादीची प्रतिमा मलीन झाल्याचे बोलले जात होते. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे सर्वाधिक २७ सदस्य असून, अध्यक्ष-उपाध्यक्ष पदही राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. मात्र काही दिवसांपूर्वीच झालेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये चार ठिकाणी नगराध्यक्ष असलेल्या राष्ट्रवादीला मोठा फटका बसल्याने राष्ट्रवादीची विस्कटलेली घडी बसविण्यासाठी आता शरद पवार स्वत: लक्ष घालणार असल्याचे बोलले जाते. पिंपळगाव बसवंत शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने शरद पवार आगामी निवडणुकांचे  रणशिंग फुंकणार आहे.(प्रतिनिधी)