शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

अवनखेडचे रूप पालटले

By admin | Updated: July 29, 2016 01:49 IST

संसद ग्रामच्या वाटेवर : वायफाय अंगणवाड्या अन् हरित स्मशानभूमी

गणेश धुरीदिंडोरी तालुक्यातील अवनखेड या पंतप्रधानांच्या महत्त्वाकांक्षी योजनेतून दत्तक घेतलेल्या गावाचे दीड वर्षात चांगलेच रूपडे पालटले आहे. शाळा अन् अंगणवाड्या २१ व्या शतकातील वाय-फाय यंत्रणेशी जशा जोडल्या गेल्या आहेत, तसेच आयुष्यातील अंतिम ठिकाण असलेले अमरधामही वैविध्यपूर्ण नटलेल्या वृक्षवल्लींनी बहरलेले आहे. आरोग्याची अवस्था मात्रही पडक्या इमारतीमुळे ‘मृत्युशय्येवर’ आहे. कादवा नदीकाठचे अवनखेड गाव तसे पाहिले तर सधन संकल्पनेत मोडते. गावात आधीपासूनच अंतर्गत सीमेंट कॉँक्रीटचे रस्ते होते, त्यात आता भूमिगत गटारींची भर पडली आहे. आता विजेच्या ताराही भूमिगत करण्याकडे ग्रामपंचायतीचा कल आहे.खाणार नाही अन् खाऊही देणार नाही, या उक्तीने वागणारे गावचे सरपंच नरेंद्र जाधव यांनी गावाचा सर्वांगीण विकास करण्याचा जणू विडाच उचलला आहे. त्यामुळे खाबूगिरीची सवय असलेले ग्रामसेवक गावात मात्र कार्यरत राहण्यास नकार देतात. विनोद अहिरे नामक ग्रामसेवकाने तूर्तास त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचे ठरविल्याने बहुतेक योजना अस्तित्वात येताना दिसत आहेत. बोटावर मोजण्याइतक्या असलेल्या सीसीटीव्ही लाभलेल्या ग्रामपंचायतींमध्ये अवनखेडचा समावेश होतो. आदर्श संसद ग्राम योजनेत कायापालट होणाऱ्या या गावात आरोग्याची पायाभूत सुविधा मात्र अजूनही सलाइनवर आहे. मात्र सातत्याच्या पाठपुराव्यामुळे गावाला ९५ लाख निधीच्या नवीन उपकेंद्राची इमारत मंजूर झाली आहे. प्रत्यक्षात इमारत उभी राहण्यास मात्र अजूनही वर्षभराचा कालावधी लागेल. गावातील सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी भूमिगत गटारांची सोय केली आहे. निर्मल ग्रामचा पुरस्कार लाभलेल्या या गावात घरकुलांची मात्र काहीशी अडचण झाली आहे. आधी मंजूर झालेली घरकुले पडकी झाल्याने नवीन घरकुले मंजुरीस तांत्रिक अडचण येत आहे. अखेरच्या प्रवासासाठी शहराच्या धर्तीवर ‘वैकुंठ रथ’ तयार करण्यात आलेला आहे. कादवा नदीकाठी छानसे सभामंडप उभारून घाट विकसित करण्यात आला आहे.इंडियन आॅइलसारख्या खासगी कंपनीने सामाजिक बांधिलकी म्हणून जगदंबानगर येथे स्त्री-पुरुषांसाठी १२ युनिटचे सार्वजनिक शोैचालय उभारले आहे. मात्र त्याच्या शुभारंभाचा मुहूर्त अजून लागलेला नाही. गावात शाळा, अंगणवाड्यांसह दहा ते बारा ठिकाणी वाय-फायचे कनेक्शन सुरू करून गावाने २१ व्या शतकात झोकात पर्दापण केले आहे.