शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

शंकराचार्यांच्या आगमनाने त्र्यंबक नगरी भक्तीमय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 19:08 IST

त्र्यंबकेश्वर : दक्षिणान्माय श्रृंगेरी शारदा पीठाधिश्वर जगद्गुरु शंकराचार्य विधुशेखर भारती स्वामीजी महाराज यांचे सोमवारी (दि.१४) विलंबी संत्सवरीय पौष शुध्द ८ सोमवार रोजी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर नगरीत आगमन झाल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण पसरले होते. यावेळी त्यांचे दर्शन व अनुग्रह वचनाचा लाभ भाविकांनी घेतला.

ठळक मुद्दे श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर नगरीत आगमन झाल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण

त्र्यंबकेश्वर : दक्षिणान्माय श्रृंगेरी शारदा पीठाधिश्वर जगद्गुरु शंकराचार्य विधुशेखर भारती स्वामीजी महाराज यांचे सोमवारी (दि.१४) विलंबी संत्सवरीय पौष शुध्द ८ सोमवार रोजी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर नगरीत आगमन झाल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण पसरले होते. यावेळी त्यांचे दर्शन व अनुग्रह वचनाचा लाभ भाविकांनी घेतला.जगदगुरु शंकराचार्यांचे सकाळी आठ वाजता नाशिकहुन त्र्यंबकेश्वर येथील तिर्थराज कुशावर्ताजवळ आगमन झाले. नगरसेवक सायली शिखरे, शितल उगले आदी सुवासिनींनी स्वामिजींचे औक्षण केले. तर त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाच्यावतीने तुतारीच्या निनांदात त्यांचे स्वागत करण्यात आले.जगदगुरु शंकराचार्यांनी गोदामाईला वंदन केले. वेदमंत्रांच्या जयघोषात गंगा पुजन करण्यात आले. यावेळी बॅण्ड पथकासह शोभायात्रा काढण्यात आली. शोभारथात त्यांना विराजमान करु न त्र्यंबकेश्वर मंदिरात आणण्यात आले. तर त्र्यंबकराजाच्या मंदिरात जाऊन त्यांनी महामृत्युंजय भगवान त्र्यंबकेश्वराचे पुजन केले. स्वामीजी एक तासभर मंदिराच्या गर्भगृहात होते. यावेळी पौरोहित्य शंकराचार्यांचे तिर्थ पुरोहित वेदमुर्ती योगेश शास्त्री शुक्ल, सचिन शुक्ल यांनी केले. यावेळी बाळासाहेब दीक्षति, लोकेश शास्त्री अकोलकर यांचेसह ब्रह्मवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्यावतीने शंकराचार्यांचा सत्कार करण्यात आला. देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष न्या. बोधनकर, विश्वस्त तथा पुरोहित संघाचे अध्यक्ष प्रशांत गायधनी, दिलीप तुंगार, संतोष कदम, तृप्ती धारणे मंदिराचे पदाधिकारी, कर्मचारी आदि यावेळी उपस्थित होते. विशेष म्हणजे श्रीशंकराचार्यांनी त्र्यंबकेश्वर देवस्थानला रु पये एक लाखाची देणगी दिल्याचे समजते.यानंतर तिर्थराज कुशावर्ताजवळील श्री गंगा गोदावरी मंदिरात गुरूवंदन व अनुग्रह वचनाचा कार्यक्र म संपन्न झाला. सर्वांना आशीर्वचनपर भाषण देण्यात आले. पुरोहित संघाचे कार्याध्यक्ष मनोज थेटे यांनी सपत्निक वेदमंत्रांच्या जयघोषात जगद् गुरू शंकराचार्यांचे पाद्यपुजन केले.यावेळी तहसीलदार महेंद्र पवार, नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, भाजपा गटनेते समीर पाटणकर, नगरसेवक अ‍ॅड. श्रीकांत गायधनी, भाजपा शहराध्यक्ष शामराव गंगापुत्र आदींसह नगरसेवक, त्र्यंबकेश्वर मंदिराचे विश्वस्त व पुरोहित संघाचे अध्यक्ष प्रशांत गायधनी, पदाधिकारी, सदस्य, गावातील ब्रह्मवृंद, नागरीक, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.