शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगारांचा आश्रयदाता ‘श्याम पवार’च्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 17:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्कपंचवटी : खून, हाणामाºया, चोरी तसेच विविध प्रकारच्या गंभीर गुन्ह्यातील संशयित गुन्हेगारांना वेळोवेळी आर्थिक मदत, आदिवासी भागात राहण्यासाठी आसरा उपलब्ध करून देणारा सुरगाणा तालुक्यातील श्याम नागू पवार यास पंचवटी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे गुन्हेगारांचा आश्रयदाता पवार हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून, त्याच्यावर खून, जबरी लूट यांसारखे गुन्हे ...

लोकमत न्यूज नेटवर्कपंचवटी : खून, हाणामाºया, चोरी तसेच विविध प्रकारच्या गंभीर गुन्ह्यातील संशयित गुन्हेगारांना वेळोवेळी आर्थिक मदत, आदिवासी भागात राहण्यासाठी आसरा उपलब्ध करून देणारा सुरगाणा तालुक्यातील श्याम नागू पवार यास पंचवटी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे गुन्हेगारांचा आश्रयदाता पवार हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून, त्याच्यावर खून, जबरी लूट यांसारखे गुन्हे दाखल आहेत.पंचवटीत काही दिवसांपूर्वी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या किरण निकम याच्या खुनातील काही संशयितांना पवार याने आश्रय दिल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते. याबरोबरच पवार हा नाशिक शहरातील पंचवटी, सिडको, सातपूर, नाशिकरोड, अंबड या भागातील गुन्हेगारांना आर्थिक मदत तसेच सुरगाणा भागातील आदिवासी पाड्यावर राहण्यासाठी जागा उपलब्ध करून देत होता़किरण निकम खून प्रकरणातील संशयितांना पवार याने मदत करून आश्रय दिल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याने त्याला गजाआड करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी (दि़ २७) सापळा रचला होता. सहायक पोलीस निरीक्षक कैलास वाघ, पोलीस निरीक्षक महेश इंगोले, पोलीस उपनिरीक्षक महेश कुलकर्णी, मोतीराम चव्हाण, आप्पा गवळी, सतीश वसावे, भूषण रायते, सचिन म्हस्दे, निंबाळकर, बस्ते, जितू जाधव यांनी सुरगाणा येथे जाऊन पवारला बेड्या ठोकून पंचवटी पोलीस ठाण्यात आणले़गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या श्याम पवार याच्यावर व्यापाºयाचे अपहरण करून खून करणे, दरोडा यांसह विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती पंचवटी पोलिसांनी दिली आहे.