शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

महिनाभरात स्वाइन फ्लूने घेतले सात बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 00:19 IST

नाशिक : शहरात स्वाइन फ्लूचा पुन्हा एकदा धोका वाढला असून, गेल्या महिनाभरात तब्बल सात रुग्णांचा बळी गेला आहे. त्यात नाशिक शहरातील तिघांचा समावेश आहे. दरम्यान, सात महिन्यांत स्वाइन फ्लूमुळे ३५ जणांचा मृत्यू ओढवला आहे. बदलत्या वातावरणामुळे स्वाइन फ्लूचा धोका वाढल्याने महापालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत रुग्णालयात संशयित रुग्णांचे स्क्रिनिंग केले जात आहे.गेल्या ...

नाशिक : शहरात स्वाइन फ्लूचा पुन्हा एकदा धोका वाढला असून, गेल्या महिनाभरात तब्बल सात रुग्णांचा बळी गेला आहे. त्यात नाशिक शहरातील तिघांचा समावेश आहे. दरम्यान, सात महिन्यांत स्वाइन फ्लूमुळे ३५ जणांचा मृत्यू ओढवला आहे. बदलत्या वातावरणामुळे स्वाइन फ्लूचा धोका वाढल्याने महापालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत रुग्णालयात संशयित रुग्णांचे स्क्रिनिंग केले जात आहे.गेल्या पाच महिन्यांपासून शहरात स्वाइन फ्लूचे रुग्ण वाढत आहेत. त्यात बाहेरून उपचारासाठी आलेल्या रुग्णांचीही संख्या आहे. १ जानेवारी ते ४ आॅगस्ट २०१७ या कालावधीत २२३ रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाली. त्यात मनपा हद्दीतील ११३, तर बाहेरील ११० रुग्णांचा समावेश आहे. सात महिन्यांत ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील १३ मनपा हद्दीतील, तर २२ हद्दीबाहेरील रुग्णांचा समावेश आहे. जुलै महिन्यात १४ रुग्ण मनपा हद्दीतील, तर २० रुग्ण बाहेरील होते. त्यात सहा जणांचा बळी गेला आहे. १ ते ४ आॅगस्ट या कालावधीत मनपा हद्दीतील ६, तर बाहेरील ५ रुग्णांना लागण झाली, तर मध्य प्रदेशतील सेंधवा येथील एका रुग्णाचा मृत्यू झाला. खासगी रुग्णालयात दाखल झालेल्या ९४ रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झालेली होती. दरम्यान, महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये आतापर्यंत ४३८७ संशयित रुग्णांचे स्क्रीनिंग करण्यात आले असून, त्यातील ५२२ रुग्णांना टॅमी फ्लूच्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून स्वाइन फ्लू बाधित रुग्णांची संख्या वाढल्याने खासगी रुग्णालयांना याबाबत सतर्कता बाळगण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. मनपा तसेच जिल्हा रुग्णालयात स्वाइन फ्लूचा विशेष कक्ष आणि कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात येऊन रुग्णांवर उपचार केले जात आहे.