लासलगाव : येथील स्टेट बॅँकेच्या शाखेसमोर मंगळवारी (दि. ६) दुपारी पावणेतीन वाजेदरम्यान खडकमाळेगाव येथील द्राक्ष बागायतदार कैलास कारभारी रायते (४५) यांनी उभी केलेल्या बोलेरो पिकअप गाडीची काच फोडून गाडीत ठेवलेली सात तोळे वजनाची सोन्याच्या दागिन्यांची पिशवी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. सदर घटनेबाबत लासलगाव पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.लासलगाव येथील विविध बॅँकेमध्ये पैसे काढणाºया व्यक्तींवर पाळत ठेवत याच सप्ताहात दुसरी घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकारच्या टेहळणी करणाºयांवर लक्ष घालण्याची गरज आहे. दोन दिवसांपूर्वी नाशिक येथे भद्रकाली पोलीस कार्यालयाच्या हद्दीत पिंपळगाव बसवंत येथील पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या वाहनाची काच फोडून दोन लाख रुपये लंपास करून टोळीने सलामी दिली आहे.दि. २८ फेब्रुवारी रोजी विंचूर येथील व्यावसायिक ईश्वर अशोक ढवण (३७) यांच्या मालकीची स्विफ्ट गाडी (क्र . एमएच १५ डीएम ३६१३) ही कृषी उत्पन्न बाजार समिती जुने मार्केट यार्डमध्ये ज्ञानेश्वर गांगुर्डे यांच्या गुदामासमोर उभी केली असताना क्लीनर साइटच्या शिट खाली ठेवलेली पाच लाख रुपयांची रक्कम अज्ञात चोरट्याने काच फोडून चोरून नेली. सदर घटनेबाबत लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सात तोळे सोन्याचे दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 02:08 IST
लासलगाव : येथील स्टेट बॅँकेच्या शाखेसमोर मंगळवारी (दि. ६) दुपारी पावणेतीन वाजेदरम्यान खडकमाळेगाव येथील द्राक्ष बागायतदार कैलास कारभारी रायते (४५) यांनी उभी केलेल्या बोलेरो पिकअप गाडीची काच फोडून गाडीत ठेवलेली सात तोळे वजनाची सोन्याच्या दागिन्यांची पिशवी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. सदर घटनेबाबत लासलगाव पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
सात तोळे सोन्याचे दागिने लंपास
ठळक मुद्देलासलगाव : आठवड्याभरातील दुसरी घटना सदर घटनेबाबत लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल