शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

सहा तालुक्यांपुरतीच होणार ‘आघाडी’?

By admin | Updated: January 25, 2017 00:25 IST

नऊ तालुक्यांत मैत्रिपूर्ण लढती शक्य

नाशिक : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी जिल्हा पातळीवर कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये सहा तालुक्यांपुरतीच आघाडी होण्याची शक्यता आहे. उर्वरित नऊ तालुक्यांसाठी दोन्ही कॉँग्रेसमध्ये मैत्रिपूर्ण लढती होणार असल्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली.  मंगळवारी (दि.२४) नाशिक जिल्हा कॉँग्रेसची तातडीची बैठक कॉँग्रेस भवनात झाली. याबैठकीत नुकत्याच घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय उमेदवारांच्या मुलाखती तसेच राष्ट्रवादी कॉँग्रेससोबत आघाडी करण्यासाठी संबंधित तालुकाध्यक्षांनी पाठविलेले अहवाल यावर चर्चा झाली. चर्चेत पंधरा पैकी सहा तालुक्यांतील अध्यक्षांनी राष्ट्रवादी कॉँग्रेससोबत आघाडी करण्याबाबत अनुकूलता दर्शविल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. या सहा तालुक्यांमध्ये नांदगाव, नाशिक, निफाड, मालेगाव, सिन्नर व येवला या तालुक्यांचा समावेश आहे, तर उर्वरित कळवण, दिंडोरी, पेठ, सुरगाणा, देवळा, चांदवड, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, बागलाण या नऊ तालुक्यांत कॉँग्रेस स्वबळावर लढण्याची चिन्हे आहेत. येथील अनेक गटात इच्छुकांची संख्या जास्त असल्याने आणि त्या तालुक्यात कॉँग्रेसची ताकद वाढल्याचा दावा संबंधित तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी केल्याने या नऊही ठिकाणी  राष्ट्रवादी कॉँग्रेससोबत मैत्रिपूर्ण लढती होण्याची शक्यता आहे. कॉँग्रेस भवनात झालेल्या बैठकीस जिल्हा प्रभारी आमदार के. सी. पाडवी, जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, आमदार निर्मला गावित, माजी खासदार प्रताप वाघ, माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, अ‍ॅड. अनिलकुमार अहेर, रामदास चारोस्कर, नानासाहेब बोरस्ते, जिल्हा परिषद गटनेते संपतराव सकाळे, डॉ. तुषार शेवाळे, प्रकाश शिंदे आदि उपस्थित होते.(प्रतिनिधी)...तरच आघाडीजिल्ह्णातील सहा तालुकाध्यक्षांनी राष्ट्रवादी कॉँग्रेससोबत आघाडी करण्यासाठी अनुकूलता दर्शविली आहे. मात्र या सहाही तालुक्यांत कॉँग्रेसला सन्मानजनक प्रस्ताव आला तरच राष्ट्रवादी कॉँग्रेससमवेत आघाडी करण्याचा निर्णय होईल. त्याबाबत प्रदेश पातळीवर अहवाल पाठविण्यात येईल.राजाराम पानगव्हाणे, जिल्हाध्यक्ष कॉँग्रेस, नाशिक