शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

वाळू तस्करी रोखण्यासाठी भरारी पथक गठित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 01:13 IST

नाशिक : जिल्ह्यात व परजिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर होत असलेली वाळू तस्करी रोखण्यासाठी त्या त्या तालुक्यातील तहसीलदार व उपविभागीय अधिकारी अपयशी ठरल्यामुळे वाळू तस्करीच्या तक्रारी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे होऊ लागल्यामुळे आता थेट जिल्ह्णातील वाळू तस्करी रोखण्यासाठी भरारी पथक गठित करण्यात आले असून, हे पथक जिल्हाधिकाºयांच्या अखत्यारीतच कामकाज करणार आहे. त्यामुळे वाळूतस्करांचे धाबे दणाणले आहेत.

ठळक मुद्देतहसीलदाराची नियुक्तीजिल्ह्यात करणार कारवाई

नाशिक : जिल्ह्यात व परजिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर होत असलेली वाळू तस्करी रोखण्यासाठी त्या त्या तालुक्यातील तहसीलदार व उपविभागीय अधिकारी अपयशी ठरल्यामुळे वाळू तस्करीच्या तक्रारी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे होऊ लागल्यामुळे आता थेट जिल्ह्णातील वाळू तस्करी रोखण्यासाठी भरारी पथक गठित करण्यात आले असून, हे पथक जिल्हाधिकाºयांच्या अखत्यारीतच कामकाज करणार आहे. त्यामुळे वाळूतस्करांचे धाबे दणाणले आहेत.नाशिक जिल्ह्यातील नद्यांतील वाळूचे लिलाव अद्याप झालेले नसून तरीदेखील तस्करांकडून चोरी-छुप्या पद्धतीने वाळूचा वारेमाप उपसा केला जात आहे. अशातच नंदुरबार, शहादा, सारंगखेडा या भागातून मोठ्या प्रमाणावर बनावट पावत्यांचा आधार घेऊन रात्री-अपरात्री नाशिकमध्ये चोरीच्या वाळूचे शेकडो ट्रक आणले जात आहेत. त्यातून शासनाने मोठे नुकसान केले जात असल्याच्या घटना घडत आहेत. शिवाय वाळूतस्करांची दादागिरी वाढल्यामुळे पकडलेले वाळूचे ट्रक चक्क तहसील कार्यालयाच्या आवारातून पळविले जात आहेत. हा सारा प्रकार पाहता विद्यमान महसूल अधिकारी वाळूमाफियांना चाप लावण्यात अपयशी ठरले असून, त्यातील काहींचे वाळूमाफियांशी असलेले संबंधही लपून राहिलेले नाहीत. अशा पार्श्वभूमीवर गौण खनिजाची तस्करी रोखण्याचे मोठे आव्हान जिल्हाधिकाºयांपुढे उभे ठाकल्याने जिल्ह्यासाठी त्यांच्या अखत्यारीत जिल्हा भरारी पथक गठित करण्यात आले आहे. या पथकाचे प्रमुख तहसीलदार शिवकुमार आवळकंठे हे असणार असून, त्यांच्या सोबत १ नायब तहसीलदार व २ मंडल अधिकारी व ३ तलाठी याचा समावेश आहे. जिल्हाधिकाºयांकडे लघुसंदेश, व्हॉट्सअ‍ॅपद्वारे ज्या तक्रारी प्राप्त होतील त्याच्या आधारे हे पथक कारवाई करणार असून, जिल्हाधिकारी अचानक तपासणीचे आदेश देतील त्यावेळी पथकाने तत्काळ कारवाई करायची आहे. वाळूमाफियांवर कारवाई करताना आणखी कर्मचाºयांची गरज भासल्यास पथकाने त्या त्या तालुक्यातील तहसीलदारांकडून जादा कुमक मागविण्याची मुभाही पथकाला देण्यात आली आहे. आवळकंठे यांनी मालेगाव व निफाड तालुक्यात वाळूमाफियांवर केलेली कडक कारवाई पाहता त्यांच्या नियुक्तीने वाळूमाफियांचे धाबे तर दणाणलेच; परंतु वाळूमाफियांशी संबंध ठेवून असलेल्या महसूल कर्मचारी, अधिकाºयांनाही धडकी भरली आहे.