शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

पांढुर्ली, साकूर उपकेंद्रासाठी स्वतंत्र वीजवाहिनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:14 IST

सिन्‍नर :तालुक्याच्या पश्चिम भागातील ठाणगाव, वडगाव सिन्‍नर, पांढुर्ली व टाकेद गटातील साकूर या वीज उपकेंद्रांना सुरळीत वीजपुरवठा होण्यासाठी स्वतंत्र ...

सिन्‍नर :तालुक्याच्या पश्चिम भागातील ठाणगाव, वडगाव सिन्‍नर, पांढुर्ली व टाकेद गटातील साकूर या वीज उपकेंद्रांना सुरळीत वीजपुरवठा होण्यासाठी स्वतंत्र वीज वाहिन्यांचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशा सूचना आमदार माणिकराव कोकाटे यांनी वीज वितरणाच्या अधिकाऱ्यांना केल्या.

खापराळे येथे १३२ केव्ही मतदारसंघातील चार वीज उपकेंद्रांसाठी मंजूर झालेल्या २ कोटी ९० लाख रुपयांच्या नवीन वीजवाहिनी टाकण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पं. स. सदस्य तातू जगताप, ठाणगावचे सरपंच ए. टी. शिंदे, पाडळीचे माजी सरपंच अशोक रेवगडे, कोनांबेचे माजी सरपंच संजय डावरे, दीपक जगताप, दत्ता पगार, कार्यकारी अभियंता राजाराम डोंगरे, उपकार्यकारी अभियंता सचिन पवार, वडगाव सिन्‍नरचे इप्पर आदी उपस्थित होते.

सिन्‍नरच्या तीन व टाकेद गटातील एका उपकेंद्रांतर्गत गावातील कृषी ग्राहक वारंवार खंडित होत असलेल्या विजेमुळे त्रस्त झाले आहेत. ही समस्या सोडविण्यासाठी खापराळे येथील १३२ केव्ही केंद्रावरून पांढुर्ली व साकूर उपकेंद्रांसाठी ३३ केव्ही वाहिनी टाकण्यात येणार आहे. तर सिन्‍नर येथून वडगाव व ठाणगाव येथे गेलेल्या वीजवाहिनीवरील भार कमी करण्यासाठी वडगाव उपकेंद्राला स्वतंत्र वीजपुरवठ्यासाठी खापराळे येथून स्वतंत्र वाहिनीसाठी ४० लाख रुपये निधी मंजूर करून आणला. त्यामुळे सुरू करण्यात आलेली ही कामे पूर्ण झाल्यानंतर कृषीसह विविध प्रकारच्या १० हजारांहून अधिक ग्राहकांची वारंवार खंडित होणाऱ्या विजेपासून शेतकऱ्यांची सुटका होणार असल्याचे आमदार कोकाटे यांनी सांगितले.

-------------------

ठाणगाव, वडगाव उपकेंद्रांना दुहेरी वीजपुरवठा

सध्या सिन्‍नरवरून ३३ केव्ही वाहिनीद्वारे ठाणगाव वीज उपकेंद्रासाठी वीजपुरवठा होत आहे. याच वाहिनीला वडगाव उपकेंद्राची वाहिनी जोडलेली आहे;मात्र वाढता वीजभार व जुनी वाहिनी यामुळे अनेकदा पुरवठा खंडित होत असतो. या वाहिनीवरील वडगाव उपकेंद्राचा भार कमी करून स्वतंत्र वीजवाहिनी टाकण्यात येणार आहे. सिन्‍नरहून ठाणगाव व खापराळेहून वडगावला गेलेली वीजवाहिनी वडगावजवळ एकमेकींना लिंक करण्यात येणार आहे. या केंद्रांना दुहेरी वीजपुरवठा होणार आहे.