त्यांची अंत्ययात्रा आज, शुक्रवारी (दि. १३) सकाळी नऊ वाजता आनंदनगर, देवपूर धुळे येथील त्यांच्या निवासस्थानापासून निघणार आहे. एकविरा देवी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे.
जळगाव जिल्ह्याच्या चोपडा तालुक्यातील बुधगाव हे त्यांचे मूळ गाव. दैनिक मतदार वृत्तपत्राचे संपादक म्हणून जुन्या काळात त्यांनी पत्रकारिता गाजवली. शोधपत्रकारितेमुळे त्यांना पत्रपंडित पा. वा. गाडगीळ पुरस्काराने गाैरविण्यात आले होते. व्यासंगी पत्रकार म्हणून त्यांची ओळख होती. अधिकारी व कर्मचारी मार्गदर्शक तसेच सेवा शर्तींविषयी गाजलेली पुस्तके लिहिणारे, कायद्याचे अभ्यासक म्हणून ते ओळखले जात.
जिल्हा परिषदेतील नोकरी सोडून त्यांनी पत्रकारितेला सुरुवात केली. जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. भास्कर वाघ प्रकरणादरम्यान त्यांना झेड दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली होती. (१२ जगतराव सोनवणे)
120821\12nsk_43_12082021_13.jpg
जगतराव सोनवणे.