शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ नागरिकांनी लुटला सहलीचा आनंद

By admin | Updated: August 14, 2016 00:44 IST

ज्येष्ठ नागरिकांनी लुटला सहलीचा आनंद

येवला : येथील श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांची चांदवड, मांगीतुंगी, सटाणा, सप्तशृंगगड अशी धार्मिक सहल बुधवारी मोठ्या उत्साहात आणि आनंदात संपन्न झाली. डोंगरदऱ्यांचा निसर्गरम्य परिसर व श्रावण महिन्यातील ऊन-पावसाचा खेळ अशा प्रफुल्लित वातावरणात सर्व ज्येष्ठ सदस्यांनी आपले वय विसरून सहलीचा आनंद लुटला. चांदवड येथील निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या श्री सिद्धिविनायक व रेणुका मातेच्या दर्शनाने सहलीस सुरुवात झाली. त्यानंतर सटाणा येथील श्री देवमामलेदारांचे दर्शन घेतले. यावेळी सटाणा येथील श्री देवमामलेदार ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यकारिणी सदस्यांनी सहलीतील सदस्यांचे सत्कार करून स्वागत केले. सटाणा येथील भांगडिया परिवारातर्फे आयोजित अल्पोपहार व पाहुणचार स्वीकारून सहल श्रीक्षेत्र मांगीतुंगीकडे मार्गस्थ झाली. मांगीतुंगी येथील १०८ फूट उंच असलेले वृषभदेवाची दर्शन घेऊन तेथील निसर्गसौंदर्याचा सर्वांनी आनंद लुटला. दुुपारचे जेवण व थोडी विश्रांती घेऊन सहल सप्तशृंगगडावर येऊन आदिमायेचे दर्शन घेतले. सहलीत सर्व सदस्य प्रापंचिक चिंता, तणाव विसरून हास्यविनोदात सहलीत पुरेपूर रममान झाले होते. सप्तशृंगगडावर छोटेखाणी सत्कार समारंभात संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष रामेश्वर कलंत्री, माजी अध्यक्ष श्यामसुंदर काबरा, उपाध्यक्ष दिगंबर कुलकर्णी, खराडे, जीवन गुप्ता, तुकाराम पवार यांचा सत्कार संघातील सदस्यांच्या हस्ते करण्यात आला. सहल यशस्वीतेसाठी अरुण गुजराथी, अशोक जाधव, राजेंद्र आहेर यांनी विशेष परिश्रम घेतले. निंबा वाणी यांनी सहलीत तयार केलेले काव्य ऐकून सहल परतीच्या मार्गाने मार्गस्थ झाली.(वार्ताहर)