शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

सेनेची एकहाती सत्ता

By admin | Updated: May 6, 2017 01:39 IST

सिडको : सिडको प्रभागात सेनेचेच सर्वाधिक नगरसेवक निवडून आल्याने साहजिकच सिडको प्रभाग सभापतिपद हे सेनेलाच मिळणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसिडको : यंदाच्या मनपा निवडणुकीत भाजपाची लाट असतानाही सिडको प्रभागात सेनेचेच सर्वाधिक नगरसेवक निवडून आल्याने साहजिकच सिडको प्रभाग सभापतिपद हे सेनेलाच मिळणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. परंतु सेनेकडून कोणाला संधी मिळणार याबाबत उत्सुकता कायम आहे. सिडको विभागात एकूण सहा प्रभाग असून, यात प्रभाग क्रमांक २४, २५, २७, २८ ,२९ व ३१ आदींचा समावेश आहे. या सहा प्रभागांतील २४ नगरसेवकांमध्ये सेनेचे १४, भाजपा ९ व राष्ट्रवादी कॉँग्रेस एक असे पक्षीय बलाबल आहे. सेनेच्या नगरसेवकांमध्ये सुधाकर बडगुजर, डी. जी. सूर्यवंशी, प्रवीण तिदमे, श्यामकुमार साबळे, दीपक दातीर, चंद्रकांत खाडे, सुदाम डेमसे, कल्पना पांडे, हर्षा बडगुजर, रत्नमाला राणे, कल्पना चुंभळे, सुवर्णा मटाले, संगीता जाधव, किरण गामणे आदींचा समावेश आहे, तर भाजपाच्या नगरसेवकांमध्ये मुकेश शहाणे, नीलेश ठाकरे, राकेश दोंदे, भगवान दोंंदे, छाया देवांग, प्रतिभा पवार, कावेरी घुगे, भाग्यश्री ढोमसे, पुष्पा आव्हाड आदींचा तर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे राजेंद्र महाले असे पक्षीय बलाबल आहे. सिडको प्रभागात सेना (चौदा) पाठोपाठ भाजपा (नऊ) दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. मागील निवडणुकीत सिडको प्रभागात भाजपाचा एकही नगरसेवक नव्हता, परंतु यंदाच्या निवडणुकीत भाजपाने मोठे यश संपादन करत तब्बल नऊ नगरसेवक निवडून आणले आहे. परंतु असे असले तरी सेनेचे नगरसेवक अधिक असल्याने सिडको प्रभागावर सेनेचाच सभापती होणार हे निश्चित मानले जात आहे. स्थायी समितीवर शिवसेनेकडून नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी व प्रवीण तिदमे यांना संधी देण्यात आली आहे. सुधाकर बडगुजर, कल्पना पांडे, रत्नमाला राणे, हर्षा बडगुजर, कल्पना चुंभळे, सुवर्णा मटाले, हे या आधीही नगरसेवक होते. तर दीपक दातीर, श्यामकुमार साबळे, चंद्रकांत खाडे, किरण गामणे हे नवीन चेहरे महापालिकेत सामील झाले आहे. यामुळे पक्ष कोणाला संधी देणार हे येत्या १९ मे रोजी होणाऱ्या निवडणुकीत स्पष्ट होणार आहे.