शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

‘सी-विजील’ अ‍ॅपवर सेल्फी, तक्रारींचा ओघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 01:39 IST

लोकसभा निवडणुकीची आचारसंहितेचे काटेकोरपालन करण्याची जबाबदारी शासकीय यंत्रणेवर असली तरी जनतेलाही आचारसंहितेबाबत जागृती निर्माण करून आचारसंहिता भंग झाल्याच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे थेट करण्याची मुभा देण्यात आली आहे.

नाशिक : लोकसभा निवडणुकीची आचारसंहितेचे काटेकोरपालन करण्याची जबाबदारी शासकीय यंत्रणेवर असली तरी जनतेलाही आचारसंहितेबाबत जागृती निर्माण करून आचारसंहिता भंग झाल्याच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे थेट करण्याची मुभा देण्यात आली आहे.त्यासाठी ‘सी-विजील’अ‍ॅप आयोगाने विकसित केले असून, या अ‍ॅपवर तक्रार नोंदविल्यास संबंधितांमार्फत शंभर तासांत कारवाई करण्यात येणार आहे. जिल्ह्णात आचारसंहिता नऊ दिवसांपूर्वी जारी झाल्याने आजवर या अ‍ॅपवर प्रशासनाला १४ विविध प्रकारच्या आचारसंहिता भंगाच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यात काही मतदारांनी थेट स्वत:ची सेल्फीच काढून पाठविली आहे. प्रशासनाने तूर्त याकडे दुर्लक्ष केले असले तरी, वारंवार संबंधितांकडून असा प्रकार झाल्यास कारवाई करण्याची तयारी चालविली आहे.सी-विजील या अ‍ॅपचा यंदाच्या निवडणुकीत पहिल्यांदाच वापर होणार आहे. त्यामुळे त्याबाबत निवडणूक यंत्रणेकडून जनजागृती केली जात असून, सदरचे अ‍ॅपवरून कोणताही व्यक्ती आपल्याभोवती होत असलेल्या आचारसंहिता भंगाची तक्रार जिल्हा निवडणूक यंत्रणेकडे नोंदवू शकतो. अशा प्रकारची तक्रार प्राप्त झाल्यास ती तक्रार संबंधित मतदारसंघाच्या निवडणूक अधिकाऱ्यांना पाठवून त्यावर त्यांनी तत्काळ कार्यवाही करण्याची यंत्रणा उभारण्यात आली आहे. या अ‍ॅपमुळे राजकीय पक्ष, उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांना चाप बसण्यास मदत होणार आहे. मतदारांनीदेखील या अ‍ॅपचा वापर सुरू केला असून, त्याद्वारे राजकीय पक्षांचे फलक, बॅनर, पोस्टर्स लावलेली छायाचित्रे अ‍ॅपवर पाठविण्यात आल्याने त्याची दखल घेतली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून सुमारे चौदा तक्रारी अशाच स्वरूपाच्या आल्या असून, त्यात सर्वाधिक तक्रारी मालेगाव येथील आहे. त्याची तत्काळ गंभीर दखल घेऊन फलक, बॅनर्स काढण्यात आले. तसेच शासकीय रुग्णालयाच्या उद्घाटनाची कोनशिला व त्यावरील राजकीय व्यक्तींचे नावेही कायम असल्याची तक्रार प्राप्त होताच कोनशिला झाकण्यात आली आहे.आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यासाठी या अ‍ॅपचा वापर होणार असला तरी, काही मतदारांनी या अ‍ॅपवर चक्क स्वत:च्या सेल्फीही पाठविण्यास सुरुवात केली आहे. निवडणूक यंत्रणेने प्रारंभी या अ‍ॅपचा वापर करताना त्याची उपयोगीता तपासून पाहण्याचा मतदारांचा भाग असावा, असे समजून दुर्लक्ष केले आहे. परंतु त्यात वाढच होत असल्याचे पाहून त्याची गंभीर दखल घेण्याचे ठरविण्यात आले असून, मुद्दामहून असा प्रयत्न झाल्यास कारवाई करण्यात येईल.- अरुण आनंदकरउपजिल्हा निवडणूक अधिकारी

टॅग्स :Electionनिवडणूकnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय