शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

स्थायी समितीवर सात सदस्यांची निवड

By admin | Updated: February 27, 2016 00:03 IST

मनसेची जागा रिक्त : कॉँग्रेसमध्ये नाट्यमय घडामोड

नाशिक : महापालिकेच्या स्थायी समितीवरील रिक्त झालेल्या आठ पैकी सात जागांवर सदस्यांची निवड विशेष महासभेत महापौर अशोक मुर्तडक यांनी घोषित केली. सत्ताधारी मनसेने सदस्याचे नावच न दिल्याने जागा रिक्त राहिली, तर कॉँग्रेसमध्ये नाट्यमय घडामोड पाहायला मिळाली. शिवसेनेने मात्र राजकीय ‘गॉडफादर’ नसलेल्या उपेक्षित महिला सदस्यांना संधी दिली. स्थायी समितीवरील शिवसेनेचे शैलेश ढगे, शोभा फडोळ आणि रिपाइंच्या ललिता भालेराव, भाजपाचे प्रा. कुणाल वाघ व रंजना भानसी, मनसेच्या सुरेखा भोसले, कॉँग्रेसचे राहुल दिवे आणि अपक्ष रशिदा शेख हे आठ सदस्य निवृत्त झाल्याने त्यांच्या रिक्त जागांवर महापौरांनी विशेष महासभेत त्या-त्या पक्षांच्या गटनेत्यांनी दिलेल्या सदस्यांच्या नावांची घोषणा केली. त्यात शिवसेनेकडून मनीषा हेकरे, मंगला आढाव, तर रिपाइंकडून प्रकाश लोंढे यांना संधी देण्यात आली. भाजपाने दिनकर पाटील व फुलावती बोडके, कॉँग्रेसकडून शाहू खैरे यांची नावे घोषित झाली. अपक्षांकडून रशिदा शेख यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली. मनसेच्या सुरेखा भोसले यांच्या रिक्त जागांवर मनसेने सदस्य न दिल्याने सदर जागा रिक्त राहिल्याचे महापौरांनी जाहीर केले. दरम्यान, भाजपाकडून फुलावती बोडके यांचे नाव निश्चित मानले जात होते, परंतु दुसऱ्या जागेवर एकमत होत नव्हते. दुसऱ्या जागेसाठी स्वत: गटनेते संभाजी मोरुस्कर यांचे नाव आघाडीवर होते, परंतु मुंडे गटाचे मानले जाणारे दिनकर पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. शिवसेनेकडून माजी महापौर विनायक पांडे, हर्षा बडगुजर यांची नावे चर्चेत होती, परंतु श्रेष्ठींकडून उपेक्षित राहिलेल्या सदस्यांना संधी देण्याचा निर्णय घेतल्याने बाहुबली उमेदवारांची नावे मागे पडली. त्यामुळे मनीषा हेकरे व मंगला आढाव यांच्या नावाचे पत्र महापौरांकडे सुपुर्द करण्यात आले. अपक्ष गटाकडूनही दामोदर मानकर इच्छुक होते, परंतु रशिदा शेख यांनाच पुन्हा संधी देण्यावर एकमत झाले. दरम्यान, मनसेकडून उर्वरित चारही सदस्यांचे राजीनामे घेऊन सर्वच्या सर्व पाच जागांसाठी स्वतंत्रपणे निवडप्रक्रिया राबविली जाणार असल्याचे मनसेच्या सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)