शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

संशयितांचा शोध सुरू

By admin | Updated: May 25, 2017 01:12 IST

नाशिक : वाल्मीकनगर येथील जालिंदर ऊर्फ ज्वाल्या उगलमुगले या २६ वर्षीय युवकाचे अपहरण केल्याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी मंगळवारी (दि. २४) दोघा संशयिताना अटक केली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : वाल्मीकनगर येथील जालिंदर ऊर्फ ज्वाल्या उगलमुगले या २६ वर्षीय युवकाचे अपहरण केल्याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी मंगळवारी (दि. २४) दोघा संशयिताना अटक केली आहे. या प्रकरणात आणखी काही संशयित आरोपींची नावे मिळाली असल्याने संशयितांची संख्या वाढणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. पावणेदोन वर्षांपूर्वी वाल्मीकनगर परिसरात राहणारा २६ वर्षीय उगलमुगले हा बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आलेली होती. उगलमुगले हा बेपत्ता असल्याने त्याचे अपहरण झाले असावे, अशी शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली होती. त्यानुसार पोलीस नाईक अशोक सरोदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वाल्मीकनगर परिसरात राहणाऱ्या संशयित अविनाश कौलकर, रोहित कडाळे यांना अटक करण्यात आली आहे. संशयितांनी त्यांच्या अन्य काही साथीदारांच्या मदतीने उगलमुगले याचे अपहरण केल्याची माहिती पोलीस सूत्रांना मिळाल्याने त्यादृष्टीने पोलीस तपास सुरू असून, या अपहरण प्रकरणात आणखी काही संशयितांची नावे पुढे येण्याची शक्यता आहे. संशयितांनी उगलमुगले याचे अपहरण का केले याबाबत चौकशी सुरू असून, यात पूर्ववैमनस्यातील वादातूनच त्याचे अपहरण केल्याची कबुली ताब्यात घेतलेल्या संशयितांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. सध्या तरी पोलिसांकडून बेपत्ता युवकाचा शोध घेतला जात असून, पोलीस तपासात पुढे जे काही स्पष्ट होईल व त्यात आणखी काही संशयितांची नावे आल्यास त्यांचाही शोध घेऊन त्यांनाही ताब्यात घेण्याची तयारी सुरू आहे.