शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

उद्या होणार अर्जांची छाननी

By admin | Updated: March 15, 2017 01:39 IST

शुक्रवारी निवडणूक कक्ष सुरू राहणार

नाशिक : सार्वजनिक वाचनालयाच्या निवडणुकीत दिवसागणिक वेगवेगळ्या घडामोडी घडत असून, मंगळवारी (दि. १४) वाचनालयातर्फे अर्ज छाननीसाठीची पूर्वीची संध्याकाळची वेळ बदलून ती सकाळी ठेवण्यात आली आहे.अर्ज छाननीसाठी याआधी गुरुवारी (दि. १६) संध्याकाळी सहा ते आठ अशी वेळ ठेवल्याने रात्री आठनंतर हरकत घेणे शक्य नाही, तसेच दुसऱ्या दिवशी शुक्रवारी रंगपंचमीची सुटी असल्याने हा दिवस वाया जाणार असल्याने उमेदवारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती. यापार्श्वभूमीवर वाचनालयाकडून अर्ज छाननी गुरुवारी (दि. १६) सकाळी ११ वाजेपासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मंगळवारी देण्यात आली.सुधारित निवडणूक कार्यक्रम प्रत्रिकेनुसार गुरुवारी सकाळी अकरा वाजेपासून वाचनालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात ही छाननीप्रक्रिया होणार असून, अर्ज छाननीनंतर वैध उमेदवारांची यादी शुक्रवारी (दि. १७) प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच शुक्रवार (दि. १७) ते रविवार (दि. १९) सकाळी अकरा ते दुपारी तीन यावेळेत उमेदवारांना अर्ज माघारी घेता येणार आहे. दरम्यान, शुक्रवारी (दि. १७) रंगपंचमीची वाचनालयाला सुटी असली तरी वाचनालयातील निवडणूक कक्ष मात्र सुरू राहणार असल्याचे वाचनालयातर्फे सांगण्यात आले. सोमवारी (दि. २०) माघारीनंतरची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर पॅनल आणि त्यांच्यातील लढतीचे चित्र स्पष्ट होईल आणि मंगळवारी सकाळी अकरा वाजता (दि. २१) चिन्ह वाटपप्रक्रिया राबविण्यात येणार आहे.सार्वजनिक वाचनालयाच्या घटनेत नमूद केल्याप्रमाणे या निवडणुकीसाठी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी सलग पाच वर्षे, तर कार्यकारिणी मंडळासाठी सलग तीन वर्षे सभासद असणे, उमेदवारांची फेब्रुवारी २०१७ पर्यंतची वार्षिक वर्गणी भरलेली असणे यासह अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी सादर करण्यात आलेल्या अर्जांवर अनुुमोदक म्हणून ५१ आणि सूचक म्हणून एका सभासदाची स्वाक्षरी तर कार्यकारिणी मंडळासाठी सादर केलेल्या अर्जावर एक सूचक आणि एक अनुमोदक अशा दोन सभासदांची स्वाक्षरी असणे हे निकष पाळले जाणार आहेत. या निवडणुकीसाठी वाचनालयाचे किमान एक वर्ष सभासद असलेल्या तसेच फेब्रुवारी २०१७ पर्यंतची वार्षिक वर्गणी भरलेल्या आणि अंतिम मतदार यादीत नाव असलेल्या सभासदांना मतदान करता येणार आहे. (प्रतिनिधी)